Home क्रीडा Vaibhv Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर संकट ? आयर्लंडमधील हिंसाचारामुळे टीम इंडियाचा दौरा धोक्यात; नेमकं घडलं काय ?

Vaibhv Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर संकट ? आयर्लंडमधील हिंसाचारामुळे टीम इंडियाचा दौरा धोक्यात; नेमकं घडलं काय ?

0
Vaibhv Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर संकट ? आयर्लंडमधील हिंसाचारामुळे टीम इंडियाचा दौरा धोक्यात; नेमकं घडलं काय ?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आयर्लंड दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहेत. भारत आणि आयर्लंड यांच्यात 26 आणि 28 जून रोजी दोन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. हे दोन्ही सामने बेलफास्टमध्ये होणार आहेत. मात्र सध्या याच शहरात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने क्रिकेट आयर्लंडने सांगितले आहे.

https://prahaar.in/2026/06/12/jaspal-rana-passes-away-indias-legendary-shooting-coach-jaspal-rana-passes-away-indian-sports-fraternity-in-mourning/

नेमकं प्रकरण काय ?

या आठवड्यात उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे झालेल्या चाकू हल्याचे घटनेनंतर लोकांना आपली घरे सोडून जावे लागले होते . यामुळे परिसरात दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क मोडवर आहेत. याचा थेट परिणाम आता भारत- आयर्लंड टी-२० मालिकेवर होण्याची शक्यता आहे. मात्र, क्रिकेट आयर्लंडने अधिकृत निवेदनात सांगितले आहे की, खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून पुढील काही दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असं सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/06/12/nashik-crime-shocking-expose-of-the-sale-of-a-minor-girl-in-nashik/

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघात निवड १५ वर्षीय वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे .जर वैभवला या दौऱ्यात संधी मिळाली, तर तो भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यावरील कोणताही निर्णय त्याच्या ऐतिहासिक पदार्पणावरही परिणाम करू शकतो.

https://prahaar.in/2026/06/12/son-kills-his-own-father-sister-injured/

श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी

या दौऱ्यात श्रेयस अय्यर पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे आयर्लंड मालिका ही केवळ वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठीच नव्हे, तर भारतीय संघाच्या नव्या नेतृत्वाच्या सुरुवातीसाठीही महत्त्वाची मानली जात आहे.सध्या तरी मालिका रद्द झालेली नसून, सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता क्रिकेट आयर्लंड आणि बीसीसीआयच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.