लंडन : इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली याने आपल्या क्रिकेट करियरातील सर्वात मोठा निर्णय घेतला. गेल्या काही काळपासून खराब फॉर्ममध्ये असलेला जॅक क्रॉलीला इंग्लंड व्यनस्थापनाने कसोटी संघातून बाहेर केल्याने जॅक क्रॉलीने क्रॉलीने आता काही काळासाठी रेड-बॉल क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो केंटच्या आगामी दोन काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.(FIFA WORLD CUP 2026)
क्रॉलीचा हा निर्णय त्याच्या सातत्याने घसरलेल्या कामगिरीनंतर आला आहे. यंदाच्या काउंटी हंगामात त्याला अपेक्षित यश मिळाले नसून, सहा सामन्यांतील 12 डावांत त्याने केवळ 226 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी अवघी 20.54 इतकी राहिली असून सर्वोच्च धावसंख्या फक्त 44 धावा आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत काही चांगल्या खेळी करूनही क्रॉलीला सातत्य राखता आले नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आलेली नाही. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक Rob Key यांनीही खराब फॉर्म हेच त्याच्या संघाबाहेर जाण्याचे प्रमुख कारण असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज Emilio Gay याला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/12/global-chess-league-2026-chess-thrills-return-to-india-fourth-season-to-be-held-in-bengaluru-tournament-kicks-off-on-september-3/
जॅक क्रॉलीची टेस्ट क्रिकेटमधील कामगिरी
जॅक क्रॉलीने इंग्लंडसाठी एकूण ६४ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ३१ च्या सरासरीने ३,५८६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २०२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध २६७ आहे. जॅक क्रॉलीने कसोटी क्रिकेटमध्ये २१ अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत.
https://prahaar.in/2026/06/12/all-116-secondary-jails-in-the-state-are-permanently-closed/
आता पूर्ण लक्ष टी-20 क्रिकेटवर
रेड-बॉल क्रिकेटमध्ये अपयशी ठरत असला तरी टी-20 क्रिकेटमध्ये क्रॉलीचा फॉर्म समाधानकारक राहिला आहे. क्रॉलीने टी-२० आंतराष्ट्रीयमध्ये १०४ सामन्यात २५२२ धावा केल्या आहेत. यात त्याने अक शतक आणि १३ अर्धशतक झळकावले आहेत. नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने ससेक्सविरुद्ध 41 चेंडूत नाबाद 75 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. यामुळे आता त्याचे लक्ष पूर्णपणे व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट आणि The Hundred स्पर्धेकडे वळले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आगामी The Hundred स्पर्धेत Sunrisers Leeds संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवले जाऊ शकते.