Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी ईडीमार्फत सुरू असून, पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या विशेष तपास पथकाकडूनही स्वतंत्र तपास सुरू आहे. या तपासादरम्यान अन्य काही बाबींचाही शोध घेतला जात आहे.
पीडित महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आरोप लपवण्यासाठी तसेच त्यांना गुंगी देण्यासाठी वैद्यकीय मदत पुरवली गेल्याचा संशय काही महिला डॉक्टरांवर व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील एका नामांकित त्वचारोगतज्ज्ञ महिला डॉक्टरचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
https://prahaar.in/2026/06/12/nashik-crime-gold-jewellery-stolen-from-inside-a-rickshaw/
विशेष तपास पथकाच्या चौकशीत, अशोक खरातला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातून कोणत्या प्रकारे सहकार्य झाले याबाबत काही मुद्दे समोर येत असल्याचे सांगितले जाते. कथित घटनांदरम्यान किंवा त्यानंतर पीडित महिलांच्या वैद्यकीय तपासण्या तसेच सोनोग्राफीसाठी संबंधित डॉक्टरांच्या क्लिनिक किंवा केंद्राचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात एसआयटीने संबंधित सोनोग्राफी सेंटरसह एका महिला आणि एका पुरुष डॉक्टरची यापूर्वी चौकशी केल्याचेही समजते.
ईडीकडून आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असताना, लैंगिक शोषणाशी संबंधित तपास एसआयटीकडून स्वतंत्रपणे सुरू आहे. या प्रकरणातील सर्व बाबी तपासातून स्पष्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/12/nashik-12-mining-areas-closed-revenue-departments-shock/
दरम्यान, पीडित महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी काही औषधे दिली जात असल्याचा तसेच गर्भधारणा झाल्यास ती लपवण्यासाठी औषधोपचार केले गेल्याचा आरोपही तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. तसेच काही वेळा पीडितांना धार्मिक विधीच्या नावाखाली गुंगी आणणारी औषधे किंवा वेदनाशामक औषधे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील डॉक्टर तसेच काही नामांकित डॉक्टरांशी संबंधित कनेक्शन समोर आल्याचे बोलले जात आहे. तथापि, या सर्व बाबींचा तपास सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.