Home महाराष्ट्र नाशिक Nashik : ‘नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं आयुष्य

Nashik : ‘नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं आयुष्य

0
Nashik : ‘नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं आयुष्य

Nashik Suicide news : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघाळे गावातील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide news) केल्याची घटना घडली आहे.

राज्यातील हुंडाबळी थांबणार कधी हा प्रश्न आता खायला उठलाय. येवला (Yeola) तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहित महिलेला जीव गमवावा लागला आहे. वाघाळे गावातील वैशाली नामदेव नवले या विवाहितेने हुंडयापायी होणाऱ्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेला वैशालीचा संसार टोकाच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाला आहे.

https://prahaar.in/2026/06/11/will-ration-card-holders-receive-food-grains-after-june-15/

लग्नानंतर काही महिन्यांतच हुंड्यासाठी छळ

जून 2023 मध्ये वैशाली नामदेव नवले हीचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती, सासरा आणि सासूकडून चारचाकी गाडी आणि शेतीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याचा (Dowry) दबाव टाकण्यात येत होता. या सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून वैशाली नवले यांनी घरासमोरील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/11/member-of-parliament-dr-shrikant-shinde-transport-minister-takes-immediate-note-of-mp-dr-shrikant-shindes-request/

येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील शरद निकुळे यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात (Yeola Taluka Police Station) पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती नामदेव नवले आणि सासरा रुस्तुम नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाघाळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here