मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या सर्वात प्रतिष्ठेच्या स्प्रर्धांपैकी एक असलेल्या वनडे विश्वचषक २०२७ चे वेळपत्रक जाहिर करण्यात आले आहे.क्रिकेटविश्वात आतापासूनच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिण आफ्रिका, जिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२७ रोजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना २१ नोव्हेंबर २०२७ ला खेळला जाणार आहे.तब्बल 48 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.
https://prahaar.in/2026/06/11/ind-vs-afg-rohit-sharma-set-to-make-history-on-the-verge-of-breaking-mohinder-amarnaths-37-year-old-record/
कोणत्या देशात किती सामने?
या विश्वचषकात सर्वाधिक सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत. मुख्य यजमान म्हणून दक्षिण आफ्रिकेत तब्बल 41 सामने होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका – 41 सामने
जिम्बाब्वे – 8 ते 10 सामने
नामिबिया – 3 सामने
तीन देशांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेमुळे आफ्रिकन क्रिकेटला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.टी-20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होत असला तरी क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाचे महत्त्व आजूनही आहे. 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा म्हणून वनडे विश्वचषकाकडे पाहिले जाते. त्यामुळे 2027 च्या या महाकुंभाची उत्सुकता आतापासूनच वाढलेली दिसली आहे.
https://prahaar.in/2026/06/11/indavsafga-349-runs-still-lost-by-dls/
या चार संघांवर असणार विशेष लक्ष
2027 च्या विश्वचषकात काही संघांकडे सर्वाधिक लक्ष असणार आहे.
1.भारत – अलीकडील काळात वनडे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ.2023 नंतर पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
2.ऑस्ट्रेलिया – गतविजेते आणि मोठ्या स्पर्धांमध्ये दबदबा राखणारा संघ.
3.दक्षिण आफ्रिका – घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार असल्याने मोठे आव्हान ठरू शकतात.
4.इंग्लंड आणि न्यूझीलंड – मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मजबूत संघ म्हणून त्यांच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
https://prahaar.in/2026/06/11/womens-worldcup-2026-starts-tommorow/
2027 विश्वचषकाचे संभाव्य वेळापत्रक
स्पर्धेची सुरुवात – 4 ऑक्टोबर 2027
अंतिम सामना – 21 नोव्हेंबर 2027
एकूण कालावधी – 48 दिवस