Home क्रीडा ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

0
ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकताच आयसीसी रँकिंग जाहिर केली आहे.यात भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतीय संघ 118 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या रेटिंगमध्ये एका गुणाची घट झाली असली तरी संघाला नंबर वन स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे.न्यूझीलंडचा संघ 113 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 103 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने मोठी झेप घेत पाकिस्तानला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचे 102 रेटिंग गुण असून पाकिस्तान 100 गुणांसह पाचव्या स्थानी घसरला आहे.(navnath ban)

https://prahaar.in/2026/06/11/fifa-world-cup-2026-will-cristiano-ronaldo-realize-portugals-dream-of-winning-the-world-cup/

कसोटीत भारत तिसऱ्या स्थानावर

कसोटी क्रिकेटमध्ये मात्र भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.ऑस्ट्रेलिया 131 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी असून दक्षिण आफ्रिका 119 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या खात्यात 104 रेटिंग गुण असून तो तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

https://prahaar.in/2026/06/11/nikhil-choudhary-delhi-born-nikhil-choudhary-makes-it-to-the-australian-squad-another-name-added-to-the-list-of-players-competing-overseas/

टी-20 मध्येही भारताचा दबदबा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारत 275 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर असून इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ICC पुरुष संघ क्रमवारी (Top 5)

ODI Rankings

1. भारत – 118 गुण

2. न्यूझीलंड – 113 गुण

3. ऑस्ट्रेलिया – 103 गुण

4. दक्षिण आफ्रिका – 102 गुण

5. पाकिस्तान – 100 गुण

https://prahaar.in/2026/06/11/fifa-world-cup-2026-whos-stronger-in-the-group/

Test Rankings

1. ऑस्ट्रेलिया – 131 गुण

2. दक्षिण आफ्रिका – 119 गुण

3. भारत – 104 गुण

https://prahaar.in/2026/06/11/resignation-drama-continues-in-trinamool-congress-rajya-sabha-mp-prakash-chik-baraik-resigns/

T20I Rankings

1. भारत – 275 गुण

2. इंग्लंड – 262 गुण

3. ऑस्ट्रेलिया – 258 गुण