Home ताज्या घडामोडी Suraj Chavan : गुड न्यूज! सूरज चव्हाणच्या घरी येणार चिमुकला पाहुणा! ‘बिग बॉस मराठी’ विजेत्याने दिली गोड बातमी

Suraj Chavan : गुड न्यूज! सूरज चव्हाणच्या घरी येणार चिमुकला पाहुणा! ‘बिग बॉस मराठी’ विजेत्याने दिली गोड बातमी

0
Suraj Chavan : गुड न्यूज! सूरज चव्हाणच्या घरी येणार चिमुकला पाहुणा! ‘बिग बॉस मराठी’ विजेत्याने दिली गोड बातमी

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सूरजने स्वतः सोशल मीडियावर खास व्हिडिओ (Video) शेअर करत तो बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

डिसेंबर महिन्यात सूरज आणि संजना यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून संजना गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. काही फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

https://prahaar.in/2026/06/11/fifa-world-cup-2026-good-news-for-indian-fans-where-can-you-watch-the-matches-and-what-is-the-subscription-fee-find-out-all-the-details/

दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने संजनाच्या चोरओटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला. अखेर सूरजने स्वतःच ही आनंदाची बातमी जाहीर करत चाहत्यांची उत्सुकता संपवली.

आपल्या खास ‘झापूक झुपूक’ स्टाईलमध्ये व्हिडिओ शेअर करत सूरज म्हणाला, “नमस्कार, जय महाराष्ट्र… तुमचा सूरज भाऊ आज खूप खुश आहे. तुमचा टॉपचा किंग बाबा होणार आहे. देणार धब्बा, टॉपचा किंग होणार पप्पा!”

https://prahaar.in/2026/06/11/icc-odi-rankings-india-back-at-number-one-dominance-maintained-in-t20s-and-odis/

सूरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच आई-बाबा होणाऱ्या सूरज आणि संजना यांच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here