Home ब्रेकिंग न्यूज Marathi Actor Shashank Ketkar : लग्नसंस्था आणि Live-in Relationship वर शशांक केतकरचं मोठं विधान!

Marathi Actor Shashank Ketkar : लग्नसंस्था आणि Live-in Relationship वर शशांक केतकरचं मोठं विधान!

0
Marathi Actor Shashank Ketkar : लग्नसंस्था आणि Live-in Relationship वर शशांक केतकरचं मोठं विधान!
Shashank Ketkar

मुंबई : मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) आपल्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. सामाजिक (Social) आणि राजकीय (Political) विषयांवर तो अनेकदा आपलं मत मांडताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीत (Interview) शशांकने भारतातील लग्नसंस्था (Marriage Institution) आणि लिव्ह-इन रिलेशनशिप (Live-in Relationship) याविषयी सविस्तर भाष्य केलं.

https://prahaar.in/2026/06/10/online-shopping-scams-every-indian-consumer-is-losing-extra-money-each-month/

लग्नसंस्थेबाबत बोलताना शशांक केतकर म्हणाला की, केवळ नवरा-बायकोचा टॅग (Tag) लागला किंवा गळ्यात मंगळसूत्र आलं म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. त्याचप्रमाणे लग्न न करता एकत्र राहिल्यानेही नात्यातील सर्व समस्या सुटतात असं होत नाही. कोणत्याही नात्यात फक्त दोन व्यक्ती नसतात, तर त्यांच्या संस्कृती (Culture), विचार आणि कुटुंबही एकत्र येत असतात. यावेळी त्याने मनोरंजन क्षेत्रात (Entertainment Industry) तसेच इतर क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या विविध घटनांचाही उल्लेख केला. काही लोक लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं तो म्हणाला.

लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मत व्यक्त करताना शशांक म्हणाला, “भारतातील काही राज्यांमध्ये (States) लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना पोलिसांकडे (Police) नोंदणी (Registration) करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मी या निर्णयाला पाठिंबा देतो. आपल्या देशात लोकसंख्या (Population) मोठी आहे आणि अनेक गुन्हे (Crimes) घडत असतात. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आधीच काही प्रमाणात नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जसं लग्नानंतर नोंदणी करणं आवश्यक असतं, तसंच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असतानाही नोंदणी करणं गरजेचं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here