Home महाराष्ट्र ठाणे JUPITER HOSPITAL : ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण; उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल

JUPITER HOSPITAL : ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण; उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल

0
JUPITER HOSPITAL : ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण; उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल
thane incident

THANE : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला झालेली अमानुष मारहाण सध्या संपूर्ण ठाणे शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. रस्त्यावर थुंकण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका ओला (Ola) कॅब चालकाने या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांना या आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/06/10/ratnagiri-news-ratnagiri-shaken-three-friends-drown-to-death/

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी एक ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसोबत ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील पदपथावरून जात होते. दरम्यान, तेथून जाणारा ओला कॅब चालक निशांत धर शुक्ला (वय ४०) याने भररस्त्यात थुंकले. हे कृत्य पाहून त्या ज्येष्ठ नागरिकाने चालकाला हटकले आणि असे अस्वच्छ कृत्य करू नका, अशी समज दिली.

यावरून संतापलेल्या चालकाने गाडीतून खाली उतरून त्या वृद्ध व्यक्तीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि चालकाने त्या ज्येष्ठ नागरिकाला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. या घटनेत त्या वृद्ध नागरिकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने त्यांना मारण्यासाठी हातात दगड उचलल्याचेही समोर आले आहे.

https://prahaar.in/2026/06/10/power-supply-to-be-cut-off-in-some-parts-of-nashik-city-on-thursday/

उपमुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. अशा प्रकारची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

https://prahaar.in/2026/06/10/panvel-karjat-corridor-railway-work-98-percent-complete/

सध्या वर्तकनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये सुरक्षिततेच्या प्रश्नावरून चिंता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here