– मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा
– तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च
मुंबई (सचिन धानजी)
मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचले गेल्यास त्या पाण्याचा निचरा योग्यप्रकारे आणि त्वरीत व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC News) ५१४ पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, या व्यतिरिक्त काही महत्वाच्या ठिकाणांवर ५००, १००० आणि ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे पंप बसवण्यात आले आहे. यामध्ये कोस्टल रोडसह मिलन सब वे, चुनाभट्टी, मस्जिद बंदर, वडाळा, महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्ट आदी ठिकाणी अधिक अश्वशक्तीचे पंप बसवण्यात आले असून पुढील तीन वर्षांसाठी कंपनींची निवड करून यावर तब्बल १२३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व भागांमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका अश्वशक्तीने प्रयत्न करून तेथे साचले जाणारे पाणी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करणार आहे. (BMC News)
https://prahaar.in/2026/06/10/bmc-news-as-many-as-14-contractors-selected-to-fill-potholes-on-roads-works-worth-only-%e2%82%b942-crore-this-year/
५०० घ मी, १००० घ मी आणि ३००० घनमीटर पंपाचा वापर, तीन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड
-मुबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज १ व ४ आणि २ मध्ये पावसाळ्याच्या कालावधीत स्थापित स्लुईस गेट परिसर
कंत्राटदार : महाबल इन्फ्रा, किंमत : १३.६७ कोटी रुपये
-‘के/पश्चिम’ विभागातील मिलन सबवे
कंत्राटदार :महाबल इन्फ्रा, किंमत : २६.७० कोटी रुपये
– ‘एल’ विभागातील चुनाभट्टी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग
कंत्राटदार : एआर डब्ल्यू -एएनसी, किंमत : २०.७१ कोटी रुपये
-‘बी’ विभागामधील मस्जिद रेल्वे स्टेशन तसेच पी डी मेलो रोड
कंत्राटदार :साज एंटरप्रायझेस, किंमत : १३.२६ कोटी रुपये
https://prahaar.in/2026/06/10/dadar-road-accident-%e2%82%b92-lakh-aid-for-the-family-of-the-youth-injured-in-the-dadar-accident/
– वडाळा फायर स्टेशन रोड,संगमनगर आणि आसपासचा परिसर
कंत्राटदार : साज एंटरप्रायझेस, किंमत : ७.२१ कोटी रुपये
कंत्राटदार : एआर डब्ल्यू-एएनसी, किंमत : २०.२० कोटी रुपये
– मुन फर्निचर पजवा पातमुखावर पेनस्टॉक प्रकारच्या पुरप्रतिबंधक गेट्सची बाधणी, पुरवठा, स्थापना करुन कार्यान्वित करणे व बसविलेल्या पुरप्रतिबंधक गेट्सचे प्रचालन व परिरक्षण
कंत्राटदार :जे.के.इन्फ्रा, किंमत : २.१२ कोटी रुपये
– ‘एच/पूर्व’ विभागातील पातमुखावर बसविलेल्या पेनस्टॉक प्रकारच्या पुरप्रतिबंधक गेट्सचे प्रचालन व परिरक्षण करणे
कंत्राटदार :महाबल इन्फ्रा, किंमत : २०.०२ कोटी रुपये