मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर आंतरबदल आणि गोरेगाव-मुलूंड लिंक रोड यांना जोडणारा उन्नत मार्ग, दहिसर (पश्चिम) लिंक रोड ते भाईदर (पश्चिम) मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील कोस्टल रोडच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या प्रकल्प कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पर्यायी जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासर्व प्रकल्पात कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (Tree Plantation on Coastal Road)
https://prahaar.in/2026/06/10/school-reopening-date-schools-in-vidarbha-to-reopen-from-june-22-education-departments-major-decision-due-to-heat/
या प्रकल्पांच्या मार्गरेषेत सुमारे ९९०४ जमिनीवरील वृक्ष बाधित होत आहेत. या बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात सुमारे ७०,००० वृक्षांचे प्रतिपूरक वनीकरण करणे आवश्यक असून त्या करिता अंदाजे ६० हेक्टर मोकळ्या जमिनीची आवश्यकता आहे अशी विनंती विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित ठाणे यांना करण्यात आली होती. त्यानुषंगाने त्यांनी १५,८४३ वृक्ष लागवड व ७ वर्षांकरिता संवर्धन करण्याकरिता मौजे. करंजाडे येथील १५ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे व त्याकरिता १२ कोटी ८१लाख ३३ हजार ६१५ एवढी रक्कम येत असल्याचे कळवले आहे. (Tree Plantation on Coastal Road)
https://prahaar.in/2026/06/10/dadar-road-accident-%e2%82%b92-lakh-aid-for-the-family-of-the-youth-injured-in-the-dadar-accident/
या सर्व प्रकल्पांतर्गत वर्सोवा ते बांगूर,चारकाेप, गोराई, गोराई जेट्टी, बोरीवली, दहिसर, मिराभाईंदर क्षेत्र आदी सर्व भागांमध्ये १०४७ झाडे कापली जाणार आहेत, तर ७३१ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. त्यामुळे एकूण १७७८झाडे कापली जाणार आहे तसेच पुनर्रोपित केली जाणार आहे. या बदल्यात एकूण १६ हजार २८६ झाडे पर्यायी जागेत लावली जाणार आहेत. वृक्ष प्राधिकरणाने प्रकल्पाला वृक्ष परवानगी देताना सूचवलेल्या भरपाई वनीकरणाच्या अटींच्या पुर्ततेसाठी शासकीय उपक्रमास नेमण्यासाठी प्रस्तावित देयक अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या व विशेषीकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ मर्यादित यांना शासकीय जमिनीवर वृक्ष लागवड करणे, वृक्ष प्रत्यारोपण व ७ वर्ष कालावधीकरता वृक्ष संवर्धन करण्यासाठी व त्यांच्या मागणीनुसार १२ कोटी ८१लाख ३३ हजार ६१५ रुपये अदा केले जाणार आहेत. (Tree Plantation on Coastal Road)