नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ मधील हिंदू महिलांच्या धर्मांतराविषयी चौकशी अहवाल सादर करा !
मुंबई – नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या बहुराष्ट्रीय आयटी आस्थापनामध्ये हिंदू महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. असे असूनही या प्रकरणात आरोपींवर धर्मांतराचा गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ धार्मिक भावना दुखवणे आणि विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २० एप्रिल या दिवशी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून या अन्वेषणाविषयी संशय व्यक्त केला होता. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या पत्राची नोंद घेऊन या प्रकरणातील धर्मांतरणाच्या दृष्टीने अन्वेषण करून चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने नाशिकच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
https://prahaar.in/2026/06/09/take-care-of-mother-study-well-vizag-steel-plant-workers-heartbreaking-final-video-message-to-family-goes-viral-after-fatal-molten-iron-accident/
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्रावरून राज्य महिला आयोगाने २३ एप्रिल या दिवशी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना याविषयीचे पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी राज्य महिला आयोगाने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पाठवली आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेने पत्रामध्ये व्यक्त केलेल्या संशयावरून ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे पत्रातील सूत्रांनुसार अन्वेषण करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारने १४ मार्च २०२६ या दिवशी धर्मांतरविरोधी कायदा संमत केला; परंतु ‘टी.सी.एस्.’मधील प्रकरणात नोंदवलेल्या ९ पैकी एकाही गुन्हात या कायद्याचा वापर केला गेला नाही. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचे धर्मांतर करण्यासाठी केलाला प्रयत्न स्पष्ट दिसत असूनही गुन्हा नोंदवतांना हे जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे का, असा संशय अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रामध्ये व्यक्त केला होता. योग्य कलमे न लावण्यामुळे आरोपींना पळवाटा मिळत आहेत, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे.