Home अध्यात्म संत नामदेव

संत नामदेव

0
संत नामदेव
sant namdev

भक्त विठोबाचे भोले। त्यांचे पायी ज्ञान लोले।।
भक्तिविण शब्दज्ञान। व्यर्थ अवघे ते जाण।।
नाही ज्याचे चित्ती भक्ती। जलो तयाची व्युत्पत्ती।।
नामा म्हणे ऐसे जाण । नाही भक्तीसी बंधन।।

संत नामदेव हे वारकरी भक्तीपरंपरेतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत. त्यांचे अवधे विश्व विठ्ठलाच्या पायी सामावले होते. विठ्ठलाशिवाय त्यांच्या ध्यानीमनी इतर कुठलाही विषय नव्हता. विठ्ठल हे त्यांचे आनंदाचे परमनिधान होते. या अभंगात संत नामदेवे म्हणतात, विठ्ठलाचे भक्त भोळे असतात. त्यांना एका विठ्ठलाशिवाय दुसरे काहीही नको असते. निशिदिन ते भक्ती रंगाचा आविष्कारात दंग असतात. म्हणूनच ज्ञान त्यांचे पायी लोळण घेते. कारण ज्ञानालासुद्धा विठ्ठलाकडे जाण्यासाठी भक्तीची पाऊलवाट सोपी वाटते. भक्तीशिवाय शब्दाद्वारा मांडलेले कुठलेही तत्व पूर्णतः निरर्थक असते.

https://prahaar.in/2026/06/04/festival-of-devotion-to-vithus-dead-body/

हे तेल समजून घेणे महत्वाचे आहे. कारण भक्तीरंगात रंगून आत्म्याशिवाय शब्दातून प्रकट होणाऱ्या ज्ञानाला ज्ञानपण प्राप्त होत नाही.ज्याच्या मनात भक्तीचा मळा फुलला नाही त्याची शब्दाची व्युत्पत्ती, अध्यात्माची व्युत्पत्ती, सारे काही फोल ठरते. असे असेल तर जळो ती व्युत्पत्ती. संत नामदेव म्हणतात, ‘विठ्ठलाच्या भक्तीला कसलेही बंधन नाही हे जाणणे महत्वाचे आहे आणि भक्ती हेच आयुष्याचे सर्वश्रेष्ठ निधान आहे.’ संत नामदेवांनी या अभंगात विठ्ठलाच्या भक्तांचे वैशिष्ट्य वर्णन केले आहे.

https://prahaar.in/2026/06/09/tri-nation-series/

विठ्ठलाचे भक्त आले असले तरी ज्ञानाचा सागर त्यांचे पायी लोळण घेतो. भक्ती हे आयुष्यातले मोठे तत्व आहे. भक्तीच्या अधिष्ठानाविना इतर ज्ञान हे केवळ कोरडे ब्रम्हज्ञान ठरते. ज्यांच्या ज्ञानाची व्युत्पन्नता काही उपयोगाची नाही. ‘जळो तयाची व्युत्पत्ति’ अशा कठोर शब्दात नामदेवानी अशा शब्दपंडितांची हजेरी घेतली आहे. अंतरंगातील निस्सीम भक्तीभाव हाच परमेश्वराकडे जाण्याचा सरळ, सोपा राजमार्ग आहे. त्यासाठी घटापटाची चर्चा करणारे कोरडे ब्रम्हज्ञान आणि पोकळ पांडित्य यांची कोहीही आवश्यकता नाही. खरा भक्त हा अहंकाराचा त्याग करून आपले सर्वस्व ईश्वरचरणी अर्पण करतो.

विठ्ठलाचा भक्त जरी वरवर भोळा भाबडा वाटला तरी त्याच्या भक्तीचे सामर्थ्य अपरंपार असते. दृढ भक्तीरंगापुढे प्रत्यक्ष देवही आपलासा होतो. भक्त हे देवाला सर्वात जवळचे सगेसोयरे असतात. देवाच्या दरबारात भक्तांना कसलेही बंधन नसते. ते मुक्तपणाने वावरतात. अंतरंगातील अहंकाराचा लोप झाला की, अनेक कृत्रिम बंधने आपोआप गळून पडतात. भक्तीच्या निरामय प्रदेशातील भक्ताच्या उत्कट भक्तीचे महत्व नामदेवांनी नेमक्या शब्दात विशद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here