Home ब्रेकिंग न्यूज BMC news : महापालिका सचिव विभागातील शिपाई पदासाठी लवकर ऑनलाईन भरती

BMC news : महापालिका सचिव विभागातील शिपाई पदासाठी लवकर ऑनलाईन भरती

0
BMC news : महापालिका सचिव विभागातील शिपाई पदासाठी लवकर ऑनलाईन भरती

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या (BMC) सचिव विभागात मागील काही वर्षांपासून शिपाई पदाच्या अनेक जागा रिक्त असून आता या पदाच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे शिपाई पदाच्या जागा भरण्यासाठी सरळ सेवेने भरती करण्यात येत आहे. ही भरती ऑनलाईन प्रक्रियाद्वारे राबवण्यात येणार आहे.

महापालिका सचिव विभागातील अनेक शिपाई पदावरील कामगार नाईक आणि जमादार पदावर पदोन्नतीने गेले असून शिपाई पदावर सध्या केवळ ८ ते ९ शिपाईच कार्यरत आहेत. त्यामुळे तब्बल ४० ते ५० शिपाई पदाच्या जागा रिक्त असून या जागा भरण्यात विलंब झाल्याने सध्या महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या विविध समित्यांच्या कार्यक्रम पत्रिकांचा बटवडा करताना पदोन्नती झालेल्या नाईक, हवीलदार, जमादार या पदावरील कामगारांनाही हातभार लावावा लागतो. शिपाई पदावरील कामगारांना अतिरिक्त कामे करावी लागत असून त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या अतिकालिन भत्त्याचे दिवस संपुष्टात आल्यानंतरही त्यांना कामे करावी लागत आहेत . त्यामुळे रिक्त असलेली शिपाई पदाच्या जागा भरण्यासाठी महापालिका सचिव विभागाच्यावतीने आता लवकरच जाहिरात काढली जाणार आहे. यासाठी शिपाई’ ह्या संवर्गाच्या सरळसेवा भरतीकरिता अर्हता आणि निवडीचे निकष व कार्यपध्दती सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव आता स्थायी समितीच्या मान्यतेला ठेवण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/09/mother-plots-with-lover-before-daughters-engagement-affair-exposed-via-mobile-status/

शैक्षणिक अर्हता

उमेदवार किमान इयत्ता १२ वी परीक्षा (उच्च माध्यमिक शालांत परिक्षा) उत्तीर्ण असावा.

किंवा

कर्मचारी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला असावा.

सरळसेवा भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय –

खुला प्रवर्ग : किमान १८ ते कमाल ३८ वर्षे

मागासवर्गीय प्रवर्ग : किमान १८ ते कमाल ४३ वर्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here