Home ब्रेकिंग न्यूज The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

0
The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. हा भराव नदीच्या प्रवाहात अडथळा आणण्यासाठी नसून, नदीकाठी उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तात्पुरता प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी टाकण्यात आला होता, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केलेला आरोप वस्तूस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्याद्वारे हा आरोप उपस्थित केला होता. कंत्राटदार मिठी नदीच्या प्रवाहात मलबा टाकून भ्रष्टाचार करत असल्याचा दावा त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे केला होता.

https://prahaar.in/2026/06/06/multi-tunneling-mumbai-a-network-of-tunnels-will-be-built-in-mumbai-expected-cost-of-rs-4392-crores/

नगरसेविकांच्या या हरकतीला पालिकेने लेखी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. रस्ते व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेल्या पाहणीनंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल मधील धीरूभाई अंबानी शाळेजवळ (कुर्ला कोर्टासमोर) ‘मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण’ (पॅकेज ३) अंतर्गत ५५ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. कंत्राटदार ‘अदानी-अशोका-अक्षया ‘ यांच्यामार्फत भिंत बांधण्यासाठी यंत्रसामग्री उभी करता यावी, म्हणून १० एप्रिल रोजी हा मातीचा भराव टाकून तात्पुरता प्लॅटफॉर्म बनवला गेला होता. कंत्राटदाराने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते की, हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असून ३१ मे पूर्वी हा सर्व भराव नदीपात्रातून पूर्णपणे हटवण्यात येईल. डॉ. सईदा खान यांनी सादर केलेले फोटो व व्हिडिओ हे याच बांधकामाच्या डंपरचे असून, त्याचा मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाशी कोणताही संबंध नाही.

https://prahaar.in/2026/06/06/bandra-nursing-college-in-bandra-on-ppp-basis/

गाळ उपसण्याची हायटेक यंत्रणा

मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिका अत्यंत शिस्तबद्ध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर एआय, व्हीटीएस आणि विशेष ॲपद्वारे ‘रियल टाइम मॉनिटरींग’ केले जाते. काम सुरू असतानाची सर्व माहिती सिस्टीमवर थेट अपलोड होते. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण गाळ उपसण्याच्या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याची ऑनलाईन नोंद ठेवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here