NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर दुर्दैवी अंत झाला असल्याचे समोर आले आहे. राधिकाची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह एका ब्रीफकेसमध्ये भरून जंगलात नेऊन जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण पंजाब परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
https://prahaar.in/2026/06/07/cyber-crime-news/
काय आहे नेमके प्रकरण?
राधिका गेल्या ४-५ दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडत नसल्याने पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. सुरुवातीला हे केवळ ‘बेपत्ता’ असल्याचे प्रकरण वाटत होते, मात्र तपासाची चक्रे फिरताच धक्कादायक माहिती समोर आली.
https://prahaar.in/2026/06/07/suspicious-death-of-a-person-during-a-live-concert-in-worli-police-investigating-from-a-drug-angle/
हत्येचा थरार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न:
मृतदेहाची विल्हेवाट: आरोपीने अत्यंत क्रूरतेने राधिकाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका ब्रीफकेसमध्ये कोंबला.
जंगलातील सांगाडा: आरोपीने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो मोटरसायकलवरून गढशंकर येथील मानसेवाल वनक्षेत्रात नेला आणि तिथे मृतदेह जाळून टाकला. जंगलात सांगाडा सापडल्यानंतर हे भयाण हत्याकांड उजेडात आले.
आरोपी जेरबंद: संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी हा भाड्याच्या घरात राहत होता.
https://prahaar.in/2026/06/07/outrageous-incident-on-a-mumbai-local-train-one-arrested-for-molesting-a-young-woman/
तपासाची दिशा:
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचे रूपांतर ‘बेपत्ता’ वरून ‘हत्या’ आणि ‘पुरावा नष्ट करणे’ अशा कलमांमध्ये करण्यात आले आहे. हत्येमागील नेमका हेतू अजूनही अस्पष्ट आहे. लवकरच नवांशहरचे एसएसपी तुषार गुप्ता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील अधिकृत आणि सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे. परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा, विशेषतः आरोपीचे राधिकाशी असलेले संबंध आणि हत्येचे कारण याचा गांभीर्याने तपास करत आहेत.