मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती अगदी आकाशाला जाऊन भिडल्या आहेत.यामुळे जो तो त्यातल्या त्यात परवडेल असे स्वप्नातले घर शोधत असतो. असंच स्वप्न घेऊन एक दाम्पत्य मुंबईमध्ये आलं.पण हे स्वप्न त्यांना एवढे महागात पडेल असा विचार त्यांनी चुकुनही केला नसेल. एका नामांकित ॲपवरून या दाम्पत्याने एक घर बुक केले. पण शेवटपर्यंत घर मिळाले नाही. ॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने वेगवेगळ्या कारणाने पैसे उकळत त्यांना दीड लाख रुपयांचा चुना लावला. अखेर दाम्प्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
https://prahaar.in/2026/06/07/share-bazar-what-will-happen-in-the-stock-market-on-monday-investors-are-worried/
पवई परिसरात राहण्यासाठी दाम्पत्याने एका नामांकित ॲप वर घर बुक केले.त्यानंतर पतीला एका मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला, ज्यात पवईमधील एका फ्लॅटची माहिती होती. त्यांनी मेसेजमध्ये दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क केला. समोरील व्यक्तीने आशिष परिहार असे नाव सांगत अधिक संपर्कासाठी पुन्हा दुसरा नंबर दिला. तक्रारदाराने त्याच दिवशी दुपारी फोन करून फ्लॅट पाहायचा आहे, असे सांगितले. रहेजा विहार येथील सनसेट २ येथील फ्लॅट पाहण्यासाठी भामट्यांनी बोलावले.
https://prahaar.in/2026/06/07/neet-ug-2026-re-exam-neet-ug-2026-re-exam-city-notice-slip-available-at-neet-nta-nic-in/
दाम्पत्याला फ्लॅट पसंत पडला. समोरील व्यक्तीने ४० हजार रुपये टोकन रक्कम मागितली. दाम्पत्याने ४० हजार रुपये पाठवले पण पैसे घेतल्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद करून ठेवला. घराच्या व्यवहारासाठी ज्या व्यक्तीला पैसे पाठवले त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे अखेर दाम्पत्याने पसंत पडलेल्या घराच्या शेजारी राहणाऱ्याची भेट घेतली. शेजारील फ्लॅटमधील व्यक्तीकडे चौकशी केली असता पैसे मागणारी व्यक्ती त्या फ्लॅटचा मालक नसल्याचे त्यांना समजले. फसवणूक झाल्याची जाणीव होताच दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.