Home महाराष्ट्र नाशिक Nashik: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी निदा खानची मोठी कबुली

Nashik: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी निदा खानची मोठी कबुली

0
Nashik: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी निदा खानची मोठी कबुली
Nida Khan

नाशिक : देशभरात चर्चेत असलेल्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवं वळण मिळाल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिने कबुली दिली आहे. तिने धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. निदा खान हिच्या जबाबासह काही गंभीर बाबी विशेष तपास पथकाने (SIT) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्याची पहिली सुनावणी ९ जून रोजी होणार असल्याने प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, SITने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात, पीडित तरुणींचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये काही धार्मिक प्रचारकांचे व्हिडिओ पाहण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणेनुसार, संशयित आरोपी निदा खान हिने चौकशीत काही लिंक पाठवल्याचा उल्लेख कथित जबाबात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/06/nashiks-jyotisha-dubai-connection/

‘ब्रेनवॉश’चा आरोप; मानसिक दबाव टाकल्याचा दावा

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) दाखल गुन्ह्याच्या तपासात पीडित तरुणीच्या मनात तिच्या धर्माबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपासात समोर आला आहे. दोषारोपपत्रानुसार, पीडितेला विशिष्ट धार्मिक विचारसरणीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. “धर्म स्वीकारल्यास मानसिक तणाव कमी होईल,” अशा स्वरूपाचे समुपदेशन किंवा संवाद झाल्याचाही दावा तपासात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याच प्रकरणात संशयित आरोपी दानिश शेख (Danish Sheikh) याच्यावर पीडितेला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेच्या पोशाखाबाबतही निर्बंध लादल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. तिला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले तसेच धार्मिक पोशाख वापरण्याबाबत मार्गदर्शन केल्याचाही उल्लेख असल्याचे समोर आले आहे.

https://prahaar.in/2026/06/05/investigation-into-nida-khan-case-deepens/

पाकिस्तान कनेक्शनचा दावा

या प्रकरणात काही पाकिस्तानी धार्मिक व्यक्तींशी संबंधित डिजिटल कंटेंटचा उल्लेख तपासात समोर आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तपास यंत्रणांनी अद्याप कोणतेही अधिकृत निष्कर्ष सार्वजनिकरीत्या जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या बाबींची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणे बाकी आहे.

दरम्यान, नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांप्रकरणी ९ जून रोजी होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात असून, तपासातून आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here