आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र*
मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महानगरपालिकेला आवाहन केले आहे की, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील ।(राणीबाग)वापरात नसलेल्या हत्तींच्या पिंजऱ्यात ईशान्य भारताच्या थीमवर आधारित प्राणी विभाग विकसित करावा आणि प्राणीसंग्रहालयातील कमी वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ३डी थिएटरचा वन्यजीव चित्रपट आणि शैक्षणिक प्रदर्शन यासाठी अधिक चांगला उपयोग करावा.
https://prahaar.in/2026/06/05/sunetra-pawar-immediately-restore-normal-life-in-storm-affected-areas-of-baramati/
महापौर रितू तावडे, पालिका आयुक्त प्रमुख अश्विनी भिडे आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे की, पर्यटकांमध्ये मुंबईतील या प्रसिद्ध प्राणीसंग्रहालयाबाबत आकर्षण वाढवण्यासाठी तेथे अधिक प्राणी प्रजाती आणण्याची गरज आहे. हत्तीचा पिंजरा सध्या रिकामा आणि वापराविना पडून आहे. या जागेचा विकास ईशान्य विभाग म्हणून करता येईल, जिथे बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग यांसारख्या प्राणी प्रजाती ठेवता येतील. प्राणी संग्रहालयाने महापालिकेला या प्रकल्पासाठी प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन आमदार अमीत साटम यांनी केले आहे.
https://prahaar.in/2026/06/05/violence-erupts-in-manipur-three-including-a-woman-killed/v
आमदार अमीत साटम यांनी प्राणिसंग्रहालयाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ३डी थिएटरच्या अपुऱ्या वापराकडेही लक्ष वेधले. हे थिएटर ‘ॲनिमल प्लॅनेट’ आणि ‘नॅशनल जिओग्राफिक’ यांसारख्या वाहिन्यांच्या सहकार्याने चालवता येईल. जिथे विद्यार्थी आणि तरुण पर्यटकांसाठी वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनावरील शैक्षणिक चित्रपट दाखवता येतील. वन्यजीव आणि आपल्या ग्रहाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो, असे आमदार अमीत साटम म्हणाले. या चित्रपट प्रदर्शनांसाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारल्यास प्राणिसंग्रहालयाला अतिरिक्त महसूल मिळू शकेल, सूचना आमदार अमीत साटम यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.