लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास स्थानकातील वॉशरूम परिसरात जोरदार स्फोट झाल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण स्टेशन परिसर दणाणून गेला. (Ludhiana Blast)
घटनेच्या वेळी स्थानकावर कटरा स्पेशल ट्रेन उभी होती. तसेच मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेची प्रतीक्षा करत होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रवासी घाबरून सुरक्षित ठिकाणी धावू लागले. काही क्षणांसाठी स्टेशन परिसरात अफवा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. (Ludhiana Blast)
https://prahaar.in/2026/06/06/no-entry-for-private-vehicles-within-200-meters-of-st-bus-stands-minister-pratap-sarnaiks-instructions/
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या ठिकाणाजवळ काही प्रवासी उपस्थित होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. तरीही स्फोटाच्या स्वरूपामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. (Ludhiana Blast)
सुरक्षा यंत्रणांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Ludhiana Blast)
https://prahaar.in/2026/06/06/maharashtra-monsoon-2026-monsoon-at-the-doorstep-of-maharashtra-next-48-hours-crucial-yellow-alert-of-rain-for-many-districts/
घटनेनंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सामानाची तपासणी वाढवण्यात आली असून स्टेशन परिसरात अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. (Ludhiana Blast)
दरम्यान, स्फोटाच्या कारणांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून तपास यंत्रणांकडून सविस्तर अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या घटनेमुळे लुधियाना रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Ludhiana Blast)