Home क्रीडा FIFA World Cup Fifa World Cup Trophy : फिफा ट्रॉफी पूर्णपणे सोन्याची असते का ? जाणून घ्या ‘या’ रंजक गोष्टी

Fifa World Cup Trophy : फिफा ट्रॉफी पूर्णपणे सोन्याची असते का ? जाणून घ्या ‘या’ रंजक गोष्टी

0
Fifa World Cup Trophy : फिफा ट्रॉफी पूर्णपणे सोन्याची असते का ? जाणून घ्या ‘या’ रंजक गोष्टी
Is the FIFA trophy made entirely of gold? Find out these interesting facts.

Fifa World Cup Trophy : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेची (Fifa World Cup) उत्सुकता जगभरातील फुटबॉल (Football) चाहत्यांमध्ये वाढत आहे. अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन आणि पोर्तुगाल यांसारखे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र या स्पर्धेइतकीच चर्चा फिफा विश्वचषक ट्रॉफीचीही होत आहे. अनेकांच्या मनात या ट्रॉफीची किंमत नेमकी किती असेल, असा प्रश्न निर्माण होतो.

फिफा विश्वचषक ट्रॉफी ही जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कारांपैकी एक मानली जाते. सध्याच्या सोन्याच्या बाजारभावानुसार ट्रॉफी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत अंदाजे २.५ लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच २ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते. मात्र तिचे ऐतिहासिक आणि भावनिक मूल्य यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

ही ट्रॉफी ३७ सेंटीमीटर उंच असून तिचे वजन सुमारे ६ किलोग्रॅम आहे. ट्रॉफी १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. तिच्या डिझाइनमध्ये दोन मानवी आकृत्या पृथ्वीला उंचावताना दाखवण्यात आल्या आहेत. जगभरातील फुटबॉलच्या लोकप्रियतेचे हे प्रतीक मानले जाते.

https://prahaar.in/2026/06/06/a-big-opportunity-for-vaibhav-suryavanshi-india-a-tri-series-matches-can-be-watched-live/

अनेकांना ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याची असल्याचे वाटते. मात्र प्रत्यक्षात ती आतून पोकळ आहे. जर ती संपूर्ण घन सोन्याची असती, तर तिचे वजन खूप जास्त झाले असते. ट्रॉफीच्या तळाशी हिरव्या रंगाचे मॅलाकाइट खनिज वापरण्यात आले आहे.

या ट्रॉफीची रचना इटलीचे शिल्पकार सिल्व्हियो गॅझानिगा यांनी केली होती. १९७४ मध्ये पश्चिम जर्मनीने सर्वप्रथम ही ट्रॉफी जिंकली होती.

विशेष बाब म्हणजे विश्वचषक विजेत्या संघाला मूळ ट्रॉफी कायमस्वरूपी दिली जात नाही. अंतिम सामन्यानंतर ती फिफाकडेच परत जाते. विजेत्या संघाला मूळ ट्रॉफीऐवजी तिची विशेष प्रतिकृती दिली जाते. त्यामुळे ही ऐतिहासिक ट्रॉफी आजही फिफाच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here