Ulhasnagar : उल्हासनगरातील गाजलेल्या कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला गोळीबाराची तक्रार करणारा दीपक ठाकूर आता स्वतःच आरोपी ठरला आहे. पोलिसांकडून त्याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वीच मुख्य आरोपी अजय राव याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करीत सत्य उघडकीस आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
https://prahaar.in/2026/06/05/police-crackdown-on-illegal-country-liquor-sellers-in-nashik/
पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मे रोजी रात्री अजय राव आणि त्याचा मित्र अभय विश्वकर्मा हे दोघे बाइक वरुन जाताना कैलास कॉलनी परिसरात काही जणांनी त्यांना अडवले आणि दोघांना खाली खेचून मारहाण करण्यात आली होती. यावेळी दीपक ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी अजय राववर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप केला होता. तसेच त्याच्या मोटारसायकलीचीही तोडफोड करण्यात आली होती.
https://prahaar.in/2026/06/05/invest-maharashtra-organization-established-for-1-trillion-economy/
पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सुरू झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेला गोळीबार या दोन्ही घटना परस्परांशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिस दोन्ही घटनांचा सोबत तपास करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामागील संपूर्ण कट आणि संबंधित आरोपींची भूमिका उघड करण्यावर भर देण्यात येत आहे. या नव्या खुलाशामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. सुरुवातीला मात्र पीडित म्हणून समोर आलेल्या व्यक्तीवरच आता गंभीर आरोप झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या उल्हासनगरमध्ये होत आहे.