Home ब्रेकिंग न्यूज Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

0
Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं स्वप्न होत ते म्हणजे पोलीस भरती. त्यासाठी दिवस रात्र मेहनत करणं हेच कधी जीवावर बेतू शकतं अशी कल्पना पण नाही करू शकत. आपण जे विचार पण नाही करू शकत ते प्रत्येक्ष जेव्हा आपल्या समोर घडतं तेव्हा आपल्या पायाखालची जमिन सरकते . अशीच एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे . प्रीती काशीराम भाकड ( वय वर्ष १९ ) नेहमी प्रमाणे सरावासाठी ती घरातून बाहेर पडली पण हा दिवस तिच्या साठी शेवटचा असेल असे तिने कधी स्वप्नात पण पाहिलं नसेल .

https://prahaar.in/2026/06/05/ulhasnagar-double-murder-case-big-twist-in-ulhasnagar-double-murder-case-complainant-is-the-main-accused-shocking-revelation-in-police-investigation/

नेमकं काय झालं असेल ? 

पोलीस भरतीसाठी ती नेहमी प्रमाणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती.नेहमी प्रमाणे सराव सुरू झाला.संचालक आणि प्रशिक्षक ह्यांच्या उपस्थितीमध्ये हा सराव सुरू होता. सराव सुरू असताना अचानक प्रीती चा पाय सरकला आणि ती खदानीच्या खोल पाण्यात पडली . प्रीती पाण्यात पडताच लगेच आरडाओरडा झाला काहींनी पाण्यात उतरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु खोल पाण्यात गेल्यामुळे श्वास गुदमरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

https://prahaar.in/2026/06/05/fda-raids-gutkha-seller-in-vinchur/

माहिती पोलिसांना मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने वळवंडा शिवारातील घटनास्थळी धाव घेतली . वळवंडा शिवारातील ग्रामस्थांच्या मदतीने प्रीतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.मृतदेह तात्काळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रीतीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबियां मोठा धक्का बसला.संपूर्ण अंबड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here