Home देश Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल! देशातील १८ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची इशारा

Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल! देशातील १८ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची इशारा

0
Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल! देशातील १८ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची इशारा
IMD Alert Monsoon

मुंबई : दक्षिण-पश्चिम मान्सूनने (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) अधिकृत प्रवेश केला असून आता त्याचा वेग वाढला आहे. केरळनंतर मान्सून कर्नाटक (Karnataka) आणि तामिळनाडूच्या (Tamilnadu) अनेक भागांत सक्रिय झाला असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) तसेच ईशान्य भारतातील इतर राज्यांमध्येही तो पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. दरम्यान, देशातील तब्बल १८ राज्यांमध्ये आज म्हणजेच ५ जून रोजी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळ आणि कर्नाटकमध्ये पुढील सात दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी ते अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांत तसेच दक्षिण भारतात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

https://prahaar.in/2026/06/04/congress-faces-criticism-for-purchasing-school-supplies-on-the-gem-portal/

दरम्यान, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये आगामी दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही समुद्री भागांमध्ये वातावरण प्रतिकूल राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना ९ जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आज केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

राजधानी दिल्लीत (New Delhi) आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. ६ जूनलाही अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ, मुजफ्फरनगर, शामली, सहारनपूर, गाझियाबाद, नोएडा, लखनौ, वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर, अयोध्या आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. पूर्व उत्तर प्रदेशात ७ ते १० जून आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ८ ते १० जूनदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/04/world-environment-day-2026-16-thousand-trees-to-be-planted-at-kanjurmarg-dumping-ground/

बिहारमधील बांका, जमुई, मुंगेर आणि भागलपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राजस्थानातील जयपूर, अलवर, भरतपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, बाडमेर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता असून वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहू शकतो.

हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, कुल्लू, कांगडा, चंबा, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये ५ आणि ६ जून रोजी मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील डेहराडून, नैनीताल, हरिद्वार, चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी, पिथौरागढ आणि उत्तरकाशी येथेही मुसळधार पावसाचा तसेच गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/04/aamir-khans-wedding-preparations-aamir-khans-reaction-to-the-discussions/

दरम्यान, प्रमुख शहरांमधील तापमानाचा (Temperature) अंदाजही समोर आला आहे. दिल्लीमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल ३३ अंश आणि किमान ३१ अंश, चेन्नईत ३७ अंश आणि २९ अंश, कोलकात्यात ३७ अंश आणि २८ अंश, लखनौ व पाटणा येथे प्रत्येकी ३९ अंश कमाल तापमान नोंदवले जाऊ शकते. रांचीमध्ये ३६ अंश आणि २६ अंश, भोपाळमध्ये ३५ अंश आणि २६ अंश, जयपूरमध्ये ३६ अंश आणि २६ अंश, तर शिमलामध्ये २५ अंश आणि १७ अंश तसेच नैनीतालमध्ये २७ अंश आणि २० अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here