मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2026 12 जूनपासून सुरू होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा सर्वात मोठा वर्ल्ड कप आहे. कारण फिफा वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच 48 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेबाबत फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही धक्कादायक निकाल समोर आले आहेत .अनेक मोठे संघ पात्रता फेरीतच बाहेर पडले आहेत.
https://prahaar.in/2026/06/05/ind-vs-afg-test-even-if-we-win-over-afghanistan-we-will-not-get-points-in-the-wtc-test-is-just-a-practice-for-team-india/
यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे चार वेळा विश्वचषक जिंकणारा इटलीचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. 1934, 1938, 1982 आणि 2006 मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या इटलीला सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कपपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
https://prahaar.in/2026/06/05/ramesh-tharanga-even-neeraj-was-left-behind-sri-lankas-rumesh-pathirages-greatness-history-created-in-diamond-league/
इटलीसोबतच नायजेरिया, डेन्मार्क, पोलंड आणि युक्रेन हे देखील पात्रता फेरीत चांगली कामगिरी करू शकले नाही. या संघांमध्ये अनेक स्टार खेळाडू असूनही त्यांना वर्ल्डकपचे तिकीट मिळवता आले नाही.विशेष म्हणजे यंदा स्पर्धेत संघांची संख्या वाढवण्यात आली आहे. आधी 32 संघ वर्ल्ड कपमध्ये खेळायचे. यावेळी 48 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे अधिक संघांना संधी मिळाली असली, तरी काही पारंपरिक आणि मजबूत संघांना पात्रता फेरी पर पार करण्यातच अपयश आले आहे. दरम्यान, गतविजेते अर्जेंटिना तसेच ब्राझिल, फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन वर्ल्ड कप जिण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यंदाचा विश्वचषक अधिक चुरशीचा आणि रोमांचक ठरणार आहे.