Home क्राईम Crime News : करणीच्या संशयातून रक्तरंजित हल्ला, शेजारी दांपत्यावर कुऱ्हाडीने वार

Crime News : करणीच्या संशयातून रक्तरंजित हल्ला, शेजारी दांपत्यावर कुऱ्हाडीने वार

0
Crime News : करणीच्या संशयातून रक्तरंजित हल्ला, शेजारी दांपत्यावर कुऱ्हाडीने वार

डहाणू : अंधश्रद्धेच्या विळख्यातून डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथे घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे. करणी केल्याच्या संशयातून शेजारी राहणाऱ्या दांपत्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती मृत्यूशी झुंज देत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास अर्जुन नामकोडा याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर शेजारी राहणारे सुरेश हरजी भरकुड आणि त्यांची पत्नी गुलाब भरकुड यांनी करणी केल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. बुधवारी दुपारी संतापाच्या भरात त्याने भरकुड दांपत्यावर जीवघेणा हल्ला केला.गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी गुजरातमधील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुलाब भरकुड यांचा मृत्यू झाला. सुरेश भरकुड यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर आरोपीने विषप्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

https://prahaar.in/2026/06/05/rbis-cautious-stance-repo-rate-as-is-but-inflation-concerns-remain/

अंधश्रद्धेचा आणखी एक बळी

करणी, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या संशयातून निष्पाप व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका अद्याप थांबलेली नाही. एका निराधार संशयाने एका महिलेचा जीव घेतला, तर एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक प्रभावी जनजागृतीची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here