Home ताज्या घडामोडी Jalgaon News : १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवं वळण; दोन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

Jalgaon News : १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवं वळण; दोन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

0
Jalgaon News : १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवं वळण; दोन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

जळगाव : जळगावच्या धरणगाव (Dharangaon ) तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलाचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे घातपात होता, याचा तपास करण्यासाठी तब्बल दोन महिने २० दिवसांनंतर प्रशासनाने पुरलेला मृतदेह बाहेर काढून सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. (Jalgaon News)

https://prahaar.in/2026/06/04/6-out-of-17-seats-in-the-legislative-council-are-unopposed/

अपघात की घातपात ?

मिळालेल्या माहितीनुसार, रेल येथील गणेश पाटील (Ganesh Patil ) हा पाळधी येथील शाळेत सहावीत शिक्षण घेत होता. १३ मार्च रोजी सायंकाळी गावातील मैदानावर काही मुलांसोबत क्रिकेट (Cricket) खेळत असताना गणेश अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. त्यानंतर त्याला घरी आणून वडील नवल पाटील यांना माहिती देण्यात आली.

वडिलांनी गणेशला तत्काळ जळगाव येथील खासगी रुग्णालयात (Private hospital) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. विशेष म्हणजे, शवविच्छेदन न करता त्याच रात्री नदीकाठी मृतदेह पुरण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/06/04/another-builder-bomb-in-nashik/

गणेशच्या छातीत क्रिकेट बॅट लागल्याची कुजबुज

दरम्यान, घटनेच्या दीड महिन्यानंतर गावात गणेशच्या छातीत क्रिकेट बॅट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर वडील नवल पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चौकशी केली असता, गणेशच्या छातीत बॅट लागल्याची बाब समोर आल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि तहसील प्रशासनाची परवानगी घेत मंगळवारी मृतदेह बाहेर काढला. सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी (Forensic investigation) धुळे येथे पाठविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणेशचा सांगाडा बाहेर काढताना वडील, आई आणि बहिणीला अश्रू अनावर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here