Home क्राईम Pune Crime: पुण्यात खळबळ! बड्या इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक; महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप

Pune Crime: पुण्यात खळबळ! बड्या इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक; महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप

0
Pune Crime: पुण्यात खळबळ! बड्या इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक; महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप
sangali crime

Crime News: पुण्यातील एका बड्या इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा वारंवार विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/06/03/major-iranian-attack-following-ceasefire-missile-and-drone-attack-on-kuwait-international-airport/

महिला कर्मचाऱ्याची तक्रार; आरोपीला बेड्या

आरोपी औंध येथील एका बड्या इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. पीडित महिला कर्मचाऱ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केला आणि आरोपीला अटक केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी वरिष्ठ अधिकारी असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी कामाव्यतिरिक्त वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिला लोणावळा येथे जेवणासाठी घेऊन जाऊन तिचा विनयभंगही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला त्रासून महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार केली.