https://prahaar.in/2026/06/03/the-ambedkar-statue-area-in-mata-ramabai-nagar-will-be-attractive/
पहाटेपासूनच मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
गणरायाच्या दर्शनाची ओढ लागलेले हजारो भाविक पहाटेपासूनच मंदिराच्या दारात उपस्थित झाले होते. यामध्ये अनेक कुटुंबं, महिला, तरुण आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. हातात पूजेचे ताट आणि मुखात बाप्पाचे नाव घेत भाविक अत्यंत श्रद्धेने शिस्तीत दर्शन घेताना दिसत आहेत.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भाविकांच्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण मंदिर परिसरात एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” या जयघोषाने प्रभादेवी आणि परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला आहे. संकष्टीच्या विशेष मुहूर्तावर मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/03/rebels-in-the-mahayuti-should-immediately-withdraw-their-applications/
प्रशासनाकडून चोख व्यवस्था
राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक मुंबईत दाखल झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मंदिर प्रशासनासह शेकडो स्वयंसेवक आणि पोलीस दल भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
https://prahaar.in/2026/06/03/jalils-name-in-the-chargesheet-in-the-nashik-tcs-conversion-case/
दिवसभर गर्दी कायम राहण्याची शक्यता
अधिक महिन्यातील या विशेष योगामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरातील ऊर्जा द्विगुणित झाली असून, रात्री उशिरापर्यंत मंदिरात ही गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता मंदिर व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे.