मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एकेकाळी दहशतीचे दुसरे नाव मानला जाणारा सय्यद मुज्जक्किर मुद्दस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा (Munna Jhingada) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भारतविरोधी कारवायांशी संबंधित कथित हेरगिरी प्रकरणाच्या तपासात त्याचे नाव समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. मुंबईतील स्थानिक गुंड म्हणून गुन्हेगारीची सुरुवात करणारा हा व्यक्ती पुढे डी-कंपनी, छोटा शकील आणि पाकिस्तानातील कथित गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
हेरगिरी रॅकेटमध्ये नाव समोर :
https://prahaar.in/2026/06/02/husband-caught-red-handed-with-mistress-at-hotel-enraged-wife-creates-ruckus-in-the-middle-of-the-street-video-goes-viral/
या प्रकरणात त्याचा (Munna Jhingada) मावस काका सय्यद अरमान आणि त्याचा सहकारी मोहम्मद रईस यांना अटक करण्यात आली होती. भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे आणि माहिती गोळा करून ती परदेशातील हँडलर्सपर्यंत पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण साखळीमागे मुन्ना झिंगाडाची (Munna Jhingada) भूमिका असल्याचा संशय आहे. या प्रकरणात तो अद्याप फरार आणि वाँटेड आरोपी मानला जातो.
विद्यार्थीदशेतून गुन्हेगारीकडे वळलेला प्रवास :
छोटा शकीलमार्फत डी-कंपनीशी संबंध :
१९९६ मध्ये अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात असताना त्याची ओळख छोटा शकीलच्या निकटवर्तीयांशी झाली. यानंतर त्याचा अंडरवर्ल्डमधील प्रभाव झपाट्याने वाढला. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील काही वर्षांत त्याने डी-कंपनीसाठी अनेक सुपारी हत्यांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे. हवाला व्यवहारांशी संबंधित व्यावसायिकांच्या हत्यांपासून प्रतिस्पर्धी टोळ्यांविरोधातील कारवायांपर्यंत त्याचे नाव अनेक गुन्ह्यांत जोडले गेले. याच काळात त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा विश्वासू सहकारी छोटा शकील यांच्या नेटवर्कशी जोडली गेल्याचे सांगितले जाते. (Munna Jhingada)
https://prahaar.in/2026/06/01/brahmos-missile-deal-indias-big-leap-on-brahmos-missile-after-vietnam-indonesia-is-also-keen-on-buying-it/
बँकॉकमधील छोटा राजन हल्ल्यात सहभागाचा आरोप :
प्रत्यार्पणावरून भारत-पाकिस्तान वाद :
शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र पाकिस्तानने तो भारतीय नसून पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. मुंबई पोलिसांनी त्याची जन्मनोंद, गुन्हेगारी नोंदी आणि बोटांचे ठसे सादर करून तो भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक तपासणीतही काही पुरावे भारतीय दाव्याला पूरक असल्याचे सांगण्यात आले. तरीही २०१९ मध्ये थायलंडच्या उच्च न्यायालयाने भारताची प्रत्यार्पण याचिका फेटाळून लावली. (Munna Jhingada)
https://prahaar.in/2026/06/01/power-of-drdos-high-caliber-bomb-before-the-world-after-the-explosion-the-fragments-flew-1-5-km-high-increasing-the-strike-capability-of-the-indian-air-force/
आजही कराचीत असल्याचा संशय :
प्रत्यार्पण प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर मुन्ना झिंगाडा (Munna Jhingada) पाकिस्तानातील कराची येथे पोहोचल्याची माहिती समोर आली. भारतीय तपास यंत्रणांच्या मते, तो आजही तेथे वास्तव्यास असून दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कच्या संरक्षणाखाली कार्यरत असल्याचा संशय कायम आहे. मुंबईतील एका स्थानिक गुंडापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी आणि कथित हेरगिरी प्रकरणांपर्यंत पोहोचलेला मुन्ना झिंगाडाचा प्रवास हा भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी आजही चिंतेचा विषय मानला जातो. त्याच्याविरोधातील विविध प्रकरणांचा तपास सुरू असून, तो अद्याप भारतीय तपास यंत्रणांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीतील महत्त्वाच्या नावांपैकी एक मानला जातो. (Munna Jhingada)