– पिवळा बहाव्याची करणार लागवड
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका तसेच ऐरोली नाका या दोन्ही परिसरात पर्यावरणपूरक आणि आकर्षक असा हरितक्षेत्र विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घ्यावा. महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र विकसित करावे, या अंतर्गत अनावश्यक झुडपे काढून परिसर स्वच्छ करावा. नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करावे. हरित पट्टा अधिक आकर्षक आणि नयनरम्य करण्यासाठी फुलझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. पंतनगर ते मुलुंड या मार्गावरील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खाडीकिनारी असलेल्या भागात एन, एस आणि टी या तीनही प्रभागांच्या हद्दीत पिवळ्या बहाव्याची लागवड करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात यावा, असे विविध निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले. (BMC News)
https://prahaar.in/2026/06/02/pune-liquor-poisoning-cause-anger-erupts-as-soon-as-the-accused-in-the-poisonous-liquor-case-reaches-phugewadi-citizens-run-with-slippers-and-stones-disaster-averted-due-to-police-vigilance/
एम पूर्व विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष खैरनुसा अकबर हुसेन, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, उपायुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, विभागीय वन अधिकारी (कांदळवन कक्ष) दीपक खाडे, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, एम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) भास्कर कसगीकर, वन परिक्षेत्र अधिकारी (कांदळवन कक्ष) प्रशांत बहादुरे, उप उद्यान अधीक्षक सुनील राठोड, महानगरपालिकेच्या पूल विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (BMC News)
https://prahaar.in/2026/06/02/impact-of-el-nino-farmers-should-avoid-rushing-in-sowing-agriculture-department-makes-important-appeal/
पंतनगर ते मुलुंड या दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गालगत खाडीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागांवर एन, एस आणि टी या तिन्ही प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून पिवळ्या बहाव्याची विशेष लागवड करण्यात यावी. खाडीकिनारी निर्माण होणारा हा बहुगुणी पट्टा पर्यावरण संवर्धनाबरोबरच मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल. या उपक्रमामुळे हरित आच्छादन वाढेल, कार्बन शोषणास चालना मिळेल, पक्षी व इतर जीवांसाठी अनुकूल अधिवास निर्माण होईल आणि नागरिकांना अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण लाभेल. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी या उपक्रमाचा प्रातिनिधिक आरंभ करण्यात यावा. (BMC News)
कडू नीम, औदुंबर, वड ,पिंपळ देखील लावायला हवेत.