Home ब्रेकिंग न्यूज दख्खनची राणी’चे ९७ व्या वर्षात पदार्पण

दख्खनची राणी’चे ९७ व्या वर्षात पदार्पण

0
दख्खनची राणी’चे  ९७ व्या वर्षात पदार्पण
TRAIN

मुंबई : मध्य रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि मानाची ट्रेन असलेल्या “डेक्कन क्वीन” (दख्खनची राणी) ने सोमवारी १ जून रोजी आपल्या सेवेच्या गौरवशाली ९७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या ऐतिहासिक ट्रेनने प्रवाशांच्या सेवेची ९६ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली असून, १ जून १९३० रोजी ही सेवा सुरू झाली होती. या खास निमित्ताने पुणे रेल्वे स्थानक आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे अधिकारी, प्रवासी आणि रेल्वेप्रेमींच्या उपस्थितीत केक कापून व गाडीला फुलांनी सजवून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

https://prahaar.in/2026/06/01/iccs-decision-will-change-cricket-increasing-the-competition-in-the-game/

यंदा डेक्कन क्वीनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना आधुनिक फर्निचर आणि सुधारित अंतर्गत सजावटीसह भोजनाचा उत्तम अनुभव घेता येणार आहे. तसेच विनाइल फ्लोअरिंग, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेन्सरची सुविधा असेल. आरामदायी आसनव्यवस्था असेल त्यासाठी वातानुकूलित चेअर कारमध्ये नवीन आसन कव्हर्स आणि डब्यांमध्ये ‘एअर फ्रेशनर डिस्पेन्सर’ची सुविधा देण्यात येणार आहे.

https://prahaar.in/2026/06/01/it-is-not-okay-for-men-to-take-advantage-of-their-beloved/

डेक्कन क्वीनची वैशिष्ट्ये

भारतीय रेल्वेमध्ये टेबल सर्व्हिस आणि मायक्रोवेव्ह, डीप फ्रीझरसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा असलेली ही एकमेव धावणारी ट्रेन आहे. सुरुवातीला ७ डब्यांसह धावणारी ही ट्रेन आता एलएचबी तंत्रज्ञानाच्या १६ डब्यांसह धावते. यात आकर्षक ‘व्हिस्टाडोम कोच’चाही समावेश आहे, ज्यातून प्रवाशांना पश्चिम घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. देशात प्रथमच रोलर बेअरिंग डबे, स्वयं-निर्मित डबे (११० व्होल्ट प्रणाली) आणि प्रथम व द्वितीय श्रेणी चेअर कार सुरू करण्याचा मान या ट्रेनला आहे. अचूक वेळ आणि सर्वोत्तम सेवेच्या जोरावर डेक्कन क्वीन ही केवळ वाहतुकीचे साधन न राहता मुंबई-पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here