प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ;
तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘बिग बॉस तमिळ’मध्ये झळकलेली अभिनेत्री जुली म्हणजेच मारिया ज्युलियाना हिने आता धक्कादायक आरोप केला आहे. थलपती विजय यांच्या TVK या राजकीय पक्षामुळे तिने आपलं बाळ गामावल्याचं तिने सांगितले आहे. सोशल मीडियावर तिला ट्रोल केल्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आणि यामुळेच तिचं मिसकॅरेज झालं असं जुलीने म्हटलं आहे.
चेन्नईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जुलीने भावूक होऊन अनेक खळबळजनक खुलासे आणि आरोप केले. तिने सांगितलं की, मार्च महिन्यात ट्रोलिंगप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. जुली पुढे म्हणाली की,’TVK’चं सरकार आल्यावर तिला ही नोटीस का पाठवण्यात आली, हे तिला समजलेलं नाही. यानंतर तिच्यावर १५ लाख रुपयांचा किडनी घोटाळ्याचा खोटा आरोप लावण्यात आला. TVKने याची संपूर्ण गोष्ट, स्क्रीनप्ले, दिग्दर्शन आणि सादरीकरण आधीच तयार करून ठेवलं होतं. यामागे एक TVK समर्थक आणि एक वकील आहे. या सगळ्यामुळे आम्ही आमचं बाळ गमावलं.”
https://prahaar.in/2026/06/01/brahmos-missile-deal-indias-big-leap-on-brahmos-missile-after-vietnam-indonesia-is-also-keen-on-buying-it/
“आमचं हे पहिलंच बाळ होतं जे आम्ही गमावलं”
ती पुढे म्हणाली, “माझं नुकतेच लग्न झालं होतं आणि आमचं हे पहिलंच बाळ होतं जे आम्ही गमावलं. ऑनलाईन छळ आणि मानसिक तणावामुळे मी माझं बाळ दगावलं. मी या गोष्टीचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करू शकते, पण माझा मुद्दा हा आहे कि माझ्याबद्दल आणि माझ्या पतीबद्दल अत्यंत घाणेरड्या आणि खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. फक्त एक महिला टीव्हीके विरोधात बोलतेय म्हणून कोणतीही लाज न बाळगता तिचं नाव खराब केलं जात आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखे काही उरलेलं नाही.”
https://prahaar.in/2026/06/01/massive-explosion-in-myanmar-55-dead-more-than-100-houses-damaged/
“विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री बनले”
“लोक म्हणतात की, विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री बनले. स्वतःच्या विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले करण्यापेक्षा त्यांनी जनतेसाठी काहीतरी करायला नको का? मी डीएमकेच्या काळात तक्रार केली होती, पण ती निवडणुकीदरम्यान होती. आता नवीन सरकार आलं आहे, तर त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नको का?”
“माझ्या मिसकॅरेजसाठी मी विजय अण्णालाच जबाबदार ठरवणार”
अभिनेत्रीने असाही आरोप केला की, तिची तक्रार गांभीर्याने घेतली जात नाहीए, कारण ज्या ८ जणांविरोधात तिने तक्रार केली आहे, ते सर्व टीव्हीकेचे समर्थक आहेत. जुलीने रडत रडत म्हटलं, “माझ्या मिसकॅरेजसाठी विजय अण्णाच जबाबदार आहेत. त्यांनी थेट काही केलं नसलं, तरी त्यांनी एकदा जरी आपल्या समर्थकांना मागे हटण्यास सांगितलं असतं, तर आज मला हे दिवस पाहावे लागले नसते.”
https://prahaar.in/2026/06/01/nashik-news-nashik-police-on-alert-after-pune-poisonous-liquor-case/
जेव्हा पत्रकारांनी तिला विचारलं की, ती टीव्हीके समर्थक आणि विजय यांना या फेक सोशल मीडिया अकाऊंट्सशी का जोडत आहे? आणि डीएमके सरकार असताना ती का बोलली नाही? तेव्हा जुलीने उत्तर दिलं, “मी आता बोलत आहे कारण हे सर्व आता माझ्यासोबत घडलं आहे.” जुली ही मुख्यमंत्री विजय यांचा विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेची समर्थक राहिली आहे. तामिळनाडू निवडणुकीदरम्यान तिने उघडपणे विजय यांच्या पक्षाचा विरोध केला होता आणि रॅलीमध्ये विधानंही केली होती.