मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियास्थित डेटा सेंटर कंपनी AirTrunk चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन खुडा (Robin Khuda) यांचे महाराष्ट्रात स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पेन ग्रोथ सेंटर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य डेटा सेंटर प्रकल्पासाठी जमीन वाटपाच्या उद्देशपत्राची (Letter of Intent) देवाणघेवाण झाल्याची माहिती दिली.
https://prahaar.in/2026/06/01/cng-car-fire-smoke-rose-and-in-an-instant-it-burst-into-flames-a-massive-fire-broke-out-in-a-cng-vehicle-parked-in-panvel-the-vehicle-was-completely-burnt-down/
या प्रकल्पासाठी तब्बल २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून डेटा सेंटरची क्षमता ३ गिगावॅट (GW) इतकी असणार आहे. राज्यातील डिजिटल अर्थव्यवस्था, डेटा स्टोरेज आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, जगातील आघाडीची गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन (Blackstone) या प्रकल्पाला पाठबळ देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/01/lpg-gas-cylinder-price-lpg-consumers-get-another-shock-gas-cylinder-price-hike-new-rates-effective-from-today/
या बैठकीला भारतातील ऑस्ट्रेलियाचे वाणिज्यदूत पॉल मर्फी (Paul Murphy) हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करत भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे नमूद केले.
Delighted to welcome CEO of @AirTrunk Mr. Robin Khuda, to Maharashtra!
We exchanged a Letter of Intent for land allotment at the Raigad Pen Growth Centre (Orange City) for their upcoming Data Center — a massive ₹2 Lakh Crore investment with 3 GW capacity!
Backed by… pic.twitter.com/u2kxcYukhV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2026