Home ब्रेकिंग न्यूज Railway Timetable : नागपूर- मडगाव एक्स्प्रेससह ४० गाड्यांच्या वेळेत बदल

Railway Timetable : नागपूर- मडगाव एक्स्प्रेससह ४० गाड्यांच्या वेळेत बदल

0
Railway Timetable : नागपूर- मडगाव एक्स्प्रेससह ४० गाड्यांच्या वेळेत बदल
train

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे विशेष मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर–मडगाव एक्स्प्रेससह ४० महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून हे वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

https://prahaar.in/2026/05/31/india-a-squad-update-big-change-in-india-a-team-riyan-parag-out-due-to-injury-rituraj-gaikwad-enters-as-vice-captain/

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि गाड्यांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येत आहे. या काळात अनेक ठिकाणी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवला जात असल्याने प्रवासाचा कालावधी काही प्रमाणात वाढणार आहे.

https://prahaar.in/2026/05/31/after-china-british-foreign-minister-yvette-cooper-visits-india-discusses-global-security-with-jaishankar/

सुधारित वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक ११२०३ नागपूर–मडगाव एक्स्प्रेस नागपूरहून दुपारी ३.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता मडगावला पोहोचेल, तर गाडी क्रमांक ११२०४ मडगाव–नागपूर एक्स्प्रेस मडगावहून सायंकाळी ७ वाजता सुटून नागपूरला रात्री ९.२५ वाजता पोहोचेल. मान्सून वेळापत्रकाचा परिणाम वंदे भारत, तेजस आणि दुरांतोसारख्या जलद व प्रीमियम गाड्यांवरही होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग निसर्गरम्य असला तरी पावसाळ्यात प्रवास आव्हानात्मक ठरत असल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रुळांची देखभाल आणि देखरेख वाढविण्यात आली असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा हेल्पलाईनवर तपासून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here