शिर्डी : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये ज्या शिर्डीचा समावेश होतो त्या साईबाबांच्या मंदिरात एका भाविकाने अतिशय मौल्यवान वस्तूचे दान केले आहे. श्रद्धा म्हणून या भाविकाने साईबाबांच्या चरणी लाखो रुपये किंमतीचा अतिशय मौल्यवान आणि सुंदर असा हार दान केला आहे. हार दान करणाऱ्याने त्याचे नाव गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर प्रशासनाला केली आहे. भाविकाच्या विनंतीला मान देत मंदिर प्रशासनाने दानशूर व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले आहे. पण साईबाबांच्या आरतीवेळी दररोज करण्यात येणाऱ्या श्रृंगारादरम्यान भाविकाने दान केलेला सुवर्ण रत्नजडीत ब्रोच साईबाबांना परिधान करण्यात येणार आहे.
दानशूर भक्ताची ओळख गुप्त ठेवली…
https://prahaar.in/2026/05/31/sachin-tendulkar-dont-put-pressure-on-vaibhav-sachin-tendulkars-clear-opinion-on-selection-in-team-india-gave-big-advice/
साईचरणी दान करणाऱ्या भाविकाने केवळ सुवर्ण हार नव्हे तर साई संस्थानला नऊ लाख रुपयांचे रोख दान देखील दिले आहे. मात्र एवढे मोठे दान करूनही संबंधित भाविकाने आपली ओळख गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला असून, नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. श्रद्धा, भक्ती आणि साईबाबांप्रती असलेली निस्सीम आस्था यामुळेच शिर्डीच्या साईदरबारात आजही अशा दानशूर भक्तांची संख्या मोठी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
https://prahaar.in/2026/05/31/gukesh-defeats-pragyananda-in-norway-chess-tournament-divya-deshmukh-leads-in-womens-category/
साईबाबांच्या आरतीवेळी नव्या वस्तूची भेट…
आज (रविवार 31 मे 2026) दिल्लीतील एका साईभक्ताने साईबाबांना हिरेजडित सुवर्ण ब्रोच अर्पण केला आहे. सुमारे 80 ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या या ब्रोचवर मौल्यवान रत्न आणि हिरे जडवण्यात आले असून या ब्रोचची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. याच भाविकाने साई संस्थानला नऊ लाख रुपयांचे रोख दान देखील दिले आहे. यामुळे संबंधित भाविकाने केलेल्या एकूण दानाचे मूल्य 24 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.