मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अनेक गाजलेल्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास करणारे विशेष संचालक सत्यव्रत कुमार (ED Director Satyavrat Kumar) यांनी सेवेत तब्बल ११ वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, त्यांनी अचानक निवृत्ती का स्वीकारली याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (ED Director Satyavrat Kumar)
भारतीय महसूल सेवेच्या (IRS) २००४ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी ईडीमध्ये दीर्घकाळ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबईत जवळपास ११ वर्षे कार्यरत असताना त्यांनी देशातील अनेक चर्चित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणांचा तपास केला. सध्या त्यांची नियुक्ती सिलीगुडी येथे होती. (ED Director Satyavrat Kumar)
https://prahaar.in/2026/05/31/horrific-accident-in-himachal-car-carrying-tourists-from-chhattisgarh-falls-into-500-feet-gorge-8-feared-dead/
मुंबईत हाताळली अनेक गाजलेली प्रकरणे :
याशिवाय फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित ९,२०० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळा प्रकरणाचाही तपास त्यांच्या देखरेखीखाली झाला होता. (ED Director Satyavrat Kumar)
राजकीय व आर्थिक क्षेत्रातील मोठ्या तपासांची जबाबदारी :
मुंबईत कार्यरत असताना सत्यव्रत कुमार यांनी महाराष्ट्रातील अनेक चर्चित राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही तपासाची धुरा सांभाळली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेपासून ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात ते प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळे ईडीच्या कारवाईंमध्ये त्यांचे नाव वारंवार चर्चेत राहिले होते. (ED Director Satyavrat Kumar)
https://prahaar.in/2026/05/31/pratap-sarnaik-a-simple-meeting-of-ministers-at-the-st-canteen-enjoying-hot-vada-pav-with-the-passengers/
इक्बाल मिर्ची, राणा कपूर आणि महादेव बेटिंग अॅप प्रकरणांचाही तपास :
२०२४ मध्ये कोलकात्यात बदली, २०२५ मध्ये मूळ सेवेत पुनर्नियुक्ती :
सप्टेंबर २०२४ मध्ये सत्यव्रत कुमार यांची ईडीचे विशेष संचालक म्हणून कोलकाता येथे बदली करण्यात आली होती. त्याआधी त्यांना ऑक्टोबर २०२६ पर्यंत ईडीमध्ये सेवा देण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र २०२५ मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ कमी करून त्यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात (CBIC) परत पाठवले होते. (ED Director Satyavrat Kumar)
https://prahaar.in/2026/05/31/france-erupts-after-football-match-celebrations-turn-into-riots-more-than-400-arrested-police-injured/
स्वेच्छानिवृत्तीमागील कारणांबाबत उत्सुकता :
देशातील सर्वात संवेदनशील आणि चर्चित आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने अचानक स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. (ED Director Satyavrat Kumar)