Home ब्रेकिंग न्यूज काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचलमध्ये भाजपने मारली बाजी

काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचलमध्ये भाजपने मारली बाजी

0
काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचलमध्ये भाजपने मारली बाजी

सिमला : काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील मंडी, धरमशला (धर्मशाळा), सोलन या तीन पालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा तर पालमपूर पालिकेत काँग्रेसचा विजय झाला आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टीने मंडी महापालिकेत १४ पैकी १२, धरमशाला मनपात १७ पैकी ११ आणि सोलन मनपात १७ पैकी १० प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असून संध्याकाळपर्यंत सगळे निकाल येतील. पालमपूर मनपात काँग्रेसने ११ आणि भाजपने २ प्रभाग जिंकले आहेत.

पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी झालेल्या चार मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तीन मनपात भाजपने सरशी साधली आहे. हा काँग्रेससाठी हिमाचलमध्ये मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

हिमाचल प्रदेशात ४ पैकी ३ मोठ्या मनपात भाजपची सरशी

मंडी – एकूण जागा १४ – भाजपने आतापर्यंत जिंकल्या १२ जागा

धरमशाला – एकूण जागा १७ – भाजपने आतापर्यंत जिंकल्या ११ जागा

सोलन – एकूण जागा १७ – भाजपने आतापर्यंत जिंकल्या १० जागा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here