ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील पावसाळ्यापूर्वीची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने ३ जून २०२६ रोजी तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. (Thane Water Cut)
https://prahaar.in/2026/05/30/nashik-bara-bungalow-filtration-plant-work-to-be-completed-by-december-2026/
या कामांसाठी बुधवार, ३ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिThane केच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेसह एम. स्टेम (MIDC) प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचाही शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Thane Water Cut)
या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद :
शटडाऊनचा फटका खालील भागांतील नागरिकांना बसणार आहे –
– घोडबंदर रोड परिसर
– लोकमान्यनगर
– वर्तकनगर
– साकेत
– ऋतुपार्क
– जेल परिसर
– गांधीनगर
– रुस्तमजी
– सिद्धांचल
– इंदिरानगर
– रूपादेवी परिसर
– श्रीनगर
– समतानगर
– सिद्धेश्वर
– इटरनिटी जंक्शन परिसर
– मुंब्रा
– कळवा येथील काही भाग
या सर्व भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे.
https://prahaar.in/2026/05/30/cisf-saves-9-lives-from-sinking-tugboat-near-colaba-lighthouse-video-of-thrilling-rescue-operation-goes-viral/
पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी :
https://prahaar.in/2026/05/30/yellow-alert-of-thunderstorms-in-these-districts-including-nashik-today/
नागरिकांना महापालिकेचे आवाहन :
पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आगाऊ नियोजन करून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेच्या देखभाल कामांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या या कामांमुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरक्षित आणि अखंड ठेवण्यास मदत होणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. (Thane Water Cut)