Home क्राईम Thane Crime : दुचाकीच्या किरकोळ धक्क्यावरून भिवंडीत तुफान राडा; तरुणाच्या कुटुंबावरही हल्ला, पाच जण जखमी

Thane Crime : दुचाकीच्या किरकोळ धक्क्यावरून भिवंडीत तुफान राडा; तरुणाच्या कुटुंबावरही हल्ला, पाच जण जखमी

0
Thane Crime : दुचाकीच्या किरकोळ धक्क्यावरून भिवंडीत तुफान राडा; तरुणाच्या कुटुंबावरही हल्ला, पाच जण जखमी
Kalyan Crime

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दुचाकीच्या किरकोळ धक्क्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण कॉलनी परिसरात घडलेल्या या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.

https://prahaar.in/2026/05/30/as-soon-as-the-evidence-from-nasrapur-came-to-light-the-family-burst-into-tears/

मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला काही तरुणांकडून चुकून धक्का लागला होता. या धक्क्यामुळे दुचाकीचे नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर संबंधित तरुणाने त्या युवकांना जाब विचारला आणि वाहन दुरुस्तीचा खर्च देण्याची मागणी केली. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून काही तरुणांनी त्याच्याशी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली.मारहाण वाढत असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने आपल्या कुटुंबीयांना मदतीसाठी बोलावले. काही वेळातच त्याचे वडील आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले. मात्र, वाद मिटण्याऐवजी वादवाढल्याचे दिसून आले. रागीट झालेल्या हल्लेखोरांनी तरुणाच्या कुटुंबीयांनाही बेदम मारहाण केली.

https://prahaar.in/2026/05/30/cyber-crime-thieves-have-discovered-a-new-method-be-careful-if-you-are-taking-selfies/

या हाणामारीत लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करण्यात आला. हल्ल्यात मलंग रोहज आणि त्यांचा मुलगा मुस्तकीम रोहज गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापती झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय राहानूर रोहज, अमीर शाहिद आणि मेहबूब रोहज हे देखील जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावरही खासगी रुगणाल्यात उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद मारहाणी पर्यंत गेला. भिवंडीत या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शांतीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here