Home क्राईम Pune Crime News : विषारी दारूकांड प्रकरणात मोठी कारवाई; हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगलेसह तिघे निलंबित

Pune Crime News : विषारी दारूकांड प्रकरणात मोठी कारवाई; हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगलेसह तिघे निलंबित

0
Pune Crime News : विषारी दारूकांड प्रकरणात मोठी कारवाई; हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगलेसह तिघे निलंबित
Pimpri Chinchwad Crime

पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) घडलेल्या विषारी दारूकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्त्वाची कारवाई करत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित (Suspend) केले आहे.

२१ मे २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी आणि विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू (Death) झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. संबंधित परिसरात अवैध दारू (Alcohol) निर्मिती व विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना आधीपासून उपलब्ध होती. मात्र त्यावर प्रभावी कारवाई करण्यात अपयश आल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/05/30/bhimashankar-temple-work-is-still-incomplete-will-have-to-wait-till-june-15-for-darshan/

पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून जनतेच्या मनात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यातील हलगर्जीपणा, निष्काळजीपणा तसेच देखरेखीतील त्रुटी याबाबत स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे.

या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकी प्रमुख हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसम मुलाणी यांचा समावेश आहे.

https://prahaar.in/2026/05/30/coastal-road-area-will-be-green-15-thousand-trees-to-be-planted-before-monsoon-target-of-60-thousand-trees/

मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम २५ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथे राहणार असून सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालयाची हद्द सोडता येणार नाही.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी वेळेत कारवाई का केली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाने जबाबदारी निश्चित करत संबंधित अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here