Home क्राईम Jalgaon : शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी, चार जणांवर गुन्हा

Jalgaon : शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी, चार जणांवर गुन्हा

0
Jalgaon : शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी, चार जणांवर गुन्हा

चाळीसगाव – फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी सौदाताबा इसार पावती इतरांच्या नावे परस्पर करून फसवणुक केल्याप्रकरणी टाकळी प्र.चा. येथील चौघांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला (Chalisgaon City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ नामदेव पाटील रा. बिलाखेड ता.चाळीसगाव यांची बिलाखेड शिवारात गट नं.159/2 मध्ये शेती असून या शेतजमिनीचे सातबारा रेकॉर्डला व महसूल दप्तरी त्यांचे नाव आहे. त्यांनी शेतजमिन विक्री करणेकामी कोणासही कधीही सोैदापावती अगर अन्य कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज करून दिला नाही.चाळीसगाव दिवाणी न्यायालयाने एकनाथ पाटील यांना 26/9/2025 रोजी न्यायालयाच्या बेलीमार्फत कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स मिळाले होते.

https://prahaar.in/2026/05/30/kalyan-news-hotel-owner-brutally-beaten-by-drunk-men-over-water-bottle-issue/

या समन्स सोबत दस्तऐवज पाहीले असता आरोपींतांनी त्यांची फसवणुक करून बिलाखेड शिवारातील गट नं.159/2 क्षेत्र 0. हे.80 आर ही शेतजमिन विक्री करून रक्कम हडपण्यासाठी 7/9/2022 रोजी 14 कोटी 10 लाख रूपये इतक्या रकमेची नोटरी सौदा इसार पावती चौघांच्यानावे करून फिर्यादी एकनाथ पाटील यांची फसवणुक केली. या संबंधी पाटील यांनी संबंधीतांवर कारवाई करावी म्हणून 26/9/2025 रोजी रजिस्टर पोस्टाने फिर्याद दिली.

https://prahaar.in/2026/05/30/thane-crime-a-minor-collision-on-a-bike-caused-a-storm-in-bhiwandi-the-young-mans-family-was-also-attacked-five-people-were-injured/

मात्र गुन्हा दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले. त्यावरून एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून किशोर काळूराम जैन, ललीत काळूराम जैन, मांगीलाल हिम्मतलाल जैन व एक महिला सर्व रा. अरिहंत ट्रेडर्स, खरजई नाका चाळीसगाव यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम 418,420,463,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ हे करीत आहेत.