मुंबई : आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात एका मोठ्या ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार हार्दिक पांड्या याच्या भविष्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ऐतिहासिक खेळाडू अदलाबदलीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू Subramaniam Badrinath याने या संभाव्य ट्रेडबाबत मोठं विधान करत चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
https://prahaar.in/2026/05/29/vaibhav-sooryvanshi-big-rumor-about-vaibhav-sooryvanshi-lalit-modis-clear-answer-to-the-talk-of-30-crores-and-a-luxurious-flat/
याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम बद्रीनाथने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक धक्कादायक ट्रेड सुचवला आहे. त्याच्या मते, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला चेन्नई सुपर किंग्सकडे पाठवून त्याच्या बदल्यात शिवम दुबे आणि युवा फलंदाज आयुष म्हात्रे यांना आपल्या संघात सामील करून घ्यावे. बद्रीनाथ म्हणाला की, “हा ट्रेड दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मुंबईला एक दमदार फिनिशर आणि भविष्यातील स्टार खेळाडू मिळेल, तर चेन्नईला अनुभवी अष्टपैलू आणि नेतृत्व करू शकणारा खेळाडू मिळेल.”
https://prahaar.in/2026/05/29/bcci-now-smart-sunglasses-are-also-banned-in-ipl-bccis-big-decision-fear-of-information-leak/
दरम्यान, काही वृत्तांनुसार मुंबई इंडियन्स फ्रँचायझी हार्दिक पांड्यासोबत पुढे जाण्याबाबत साशंक असल्याचेही सांगितले जात आहे. संघातील अंतर्गत वातावरण आणि मैदानावरील कामगिरी लक्षात घेता व्यवस्थापन नव्या पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे.