मुंबई : १ जून २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर, बँकिंग व्यवहारांवर आणि घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींपासून ते एटीएम, यूपीआय व्यवहार, पॅन कार्ड नियम आणि रेल्वे सेवांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत. (New Rules From June 1)
डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वात मोठा बदल :
https://prahaar.in/2026/05/29/this-is-the-most-profitable-date-to-invest-in-ppf-a-small-rule-can-earn-you-more-interest/
गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार :
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला होता. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दरांचा आढावा घेत असल्याने १ जूनपासून नवीन दर लागू होऊ शकतात. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (New Rules From June 1)
तब्बल ७७ रेल्वे गाड्या होणार रद्द :
दरम्यान, रेल्वे प्रवाशांनाही जून महिन्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ट्रॅक अपग्रेडेशन आणि देखभाल कामांमुळे देशभरात अनेक रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार असून तब्बल ७७ गाड्या रद्द राहणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमधील रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. काही सुपरफास्ट आणि दुरंतो एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. (New Rules From June 1)
https://prahaar.in/2026/05/29/bank-holidays-in-june-2026-banks-will-have-11-days-off-in-june-check-this-list-before-doing-any-transactions/
पॅन कार्ड नियमांमध्येही मोठा बदल :
सोलर क्षेत्रातही नवीन आणि कडक नियम लागू :
याशिवाय, सरकार सोलर क्षेत्रातही नवीन आणि कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. १ जूनपासून सरकारी योजनांअंतर्गत फक्त प्रमाणित आणि अधिकृत यादीतील सोलर मॉड्यूल्स व सेल्स वापरण्याची परवानगी असेल. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे सोलर पॅनेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (New Rules From June 1)
https://prahaar.in/2026/05/29/stock-market-rebounds-after-volatility-it-stocks-rally-strongly/
एफडीच्या व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता :
बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल दिसू शकतात. एटीएम व्यवहारांवरील शुल्क, मोफत पैसे काढण्याची मर्यादा आणि एफडीच्या व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी दैनंदिन कॅश लिमिटमध्ये आधीच बदल केले असून ग्राहकांनी आपल्या बँकेच्या सूचना वेळोवेळी तपासणे गरजेचे ठरणार आहे. (New Rules From June 1)
पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही होणार वाढ :