Home महाराष्ट्र नाशिक Nashik : रिंगरोड भूसंपादनाच वाद चिघळला, प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला

Nashik : रिंगरोड भूसंपादनाच वाद चिघळला, प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला

0
Nashik : रिंगरोड भूसंपादनाच वाद चिघळला, प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला

Nashik : नाशिक भोवतालच्या प्रस्तावित बाह्य रिंग रोड भूसंपादनाचा वाद चिघळताना दिसत आहे. भूसंपादन प्रक्रियेविरोधात सुरूअसलेल्या आंदोलनात आता प्रशासकीय विरुद्ध शेतकरी असा संघर्ष निर्माण झाला आहे. भूसंपादन प्रक्रियेदरम्यान मुंगसारा येथील महिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती, याच मारहाणीचा निषेध म्हणून संतापून आंदोलकांनी प्रांतधिकारी पवन दत्ता यांच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२८) रामकुंडावरील (Ramkund) उपोषणस्थळी प्रतीकात्मक दशक्रिया विधी आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी वेळीच हस्तक्षेप करत हा कार्यक्रम उधळून लावला.

https://prahaar.in/2026/05/28/despite-24-hour-surveillance-by-drones-blood-stained-water-in-the-river/

रिंगरोड प्रकरणात २६ मे पासून आमरण उपोषण सुरू

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmla) पार्श्वभूमीवर नाशिक भोवतालच्या ६६ किलोमीटरचा बाह्य रिंग रोड प्रस्तावित असला,तरी यामुळे २५ गावांतील शेतकऱ्यांची सुपीक व उपजाऊ जमीन नष्ट होणार असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी २६ मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी नेते साहेबराव दातीर, ॲड. कैलास खांडबहाले आणि सचिन जाधव यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. कडक उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली असून साहेबराव दातीर यांचा रक्तदाब (बीपी) वाढला आहे, तर खांडबहाले व जाधव यांना डिहायड्रेशनचा (शरीरातील पाणी कमी होणे) तीव्र त्रास सुरू झाला आहे.

https://prahaar.in/2026/05/28/nashik-police-sub-inspector-in-custody/

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी करून त्यांना तातडीने सलाईन लावण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला उपोषणकर्त्यांनी नकार दिला, मात्र नंतर त्यांना जबरदस्तीने सलाईन लावण्यात आले.शासनाने बाह्य रिंग रोडचा अट्टाहास न धरता केवळ डीपी रोड करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची (Farmer) आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here