Home ताज्या घडामोडी Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ चे ७ व्या दिवशी तब्बल इतकं कलेक्शन !

Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ चे ७ व्या दिवशी तब्बल इतकं कलेक्शन !

Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ चे ७ व्या दिवशी तब्बल इतकं कलेक्शन !
Deool Band 2 1st Day Collection

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ला (Deool Band) चित्रपटगृहात (Box Office Collection) प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘देऊळ बंद’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘देऊळ बंद 2’ पाहण्यासाठीही चित्रपटगृहात प्रचंड गर्दी जमत आहे. ‘देऊळ बंद 2’चा कमाईचा आलेख हा चढताच दिसत आहे. सातत्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत आहे. हा सिनेमा २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित केला होता. ७ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाने आतापर्यंत 25 कोटींचा टप्पा गाठला आहे.

https://prahaar.in/2026/05/28/prajaktas-beauty-on-the-cannes-red-carpet-adorned-by-nirupa-sarees/

सॅकनिल्क ट्रेंडच्या रिपोर्ट्सनुसार, ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर(Box Office) उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. सातव्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने ३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. देशभरात या चित्रपटाचे १,८७८ शोज झाले. या शोजमधून या चित्रपटाने ३.३५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून प्रेक्षकांचा या चित्रपटाला भक्कम पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या ६ दिवसांत या चित्रपटाने २२.५० कोटींचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या मराठी चित्रपटाला कौटुंबिक प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, याचे प्रतिबिंब त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीतूनही दिसून येत आहे. दरम्यान, प्रेक्षकांकडून असे बोलले जात आहे की ; या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आलेख नेहमी चढताच राहील.

https://prahaar.in/2026/05/28/iran-america-war-iran-retaliate-after-us-attack-missile-strike-on-us-military-bases-high-alert-in-kuwait/

सात दिवसांत ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?

‘देऊळ बंद २’ हा चित्रपट २१ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.४५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, २३ मे रोजी अर्थात विकेंडला या चित्रपटाने ४.८५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तर, चौथ्या दिवशी या चित्रपटाने ५.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी या चित्रपटाने ३.४० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, सहाव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचा गल्ला जमावला. मिळालेल्या माहितीनुसार, सातव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. देशभरात आतापर्यंत या चित्रपटाने एकूण २५.८५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

https://prahaar.in/2026/05/28/iran-america-war-iran-retaliate-after-us-attack-missile-strike-on-us-military-bases-high-alert-in-kuwait/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here