Home देश Dhurandhar Production Designer : बॉलिवूडमध्ये खळबळ! नागपूरच्या तरुणीला ‘हॉटेलमध्ये बोलावले अन्…; ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ फेम जॉन जोसेफविरोधात बलात्काराची तक्रार

Dhurandhar Production Designer : बॉलिवूडमध्ये खळबळ! नागपूरच्या तरुणीला ‘हॉटेलमध्ये बोलावले अन्…; ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ फेम जॉन जोसेफविरोधात बलात्काराची तक्रार

0
Dhurandhar Production Designer : बॉलिवूडमध्ये खळबळ! नागपूरच्या तरुणीला ‘हॉटेलमध्ये बोलावले अन्…; ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ फेम जॉन जोसेफविरोधात बलात्काराची तक्रार
Dhurandar Production Designer

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या ‘धुरंधर’ (Dhurandar) या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर (Production Designer) जॉन जोसेफ ज्यांना जोएल किंवा सैनी एस. जोहरे (Saini S Johray) या नावानेही ओळखले जाते. यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. चंदीगडमध्ये एका तरुणीने त्यांच्या विरोधात थेट एफआयआर (FIR) दाखल केला असून, हॉटेलच्या खोलीत बोलावून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार व शारीरिक छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/05/26/indias-new-era-of-immortality-is-coming-under-the-leadership-of-prime-minister-modi/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी ही मूळची महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी आहे. २०२५ मध्ये चंदीगडमधील सेक्टर १८ येथील टागोर थिएटरमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. याच दरम्यान तिची ओळख चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमचा भाग असलेल्या जॉन जोसेफ यांच्याशी झाली. आरोपीने तरुणीला चित्रपटात आणि इतर अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये काम देण्याचे मोठे आमिष दाखवले. या आश्वासनांनंतर त्यांच्यात व्यावसायिक पातळीवर संवाद आणि पत्रव्यवहार वाढू लागला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ओळख वाढल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ रोजी, आरोपी जॉन जोसेफने तरुणीला ‘प्रोजेक्टवर चर्चा’ करण्याच्या बहाण्याने सेक्टर १७ मधील एका हॉटेलच्या रूममध्ये बोलावले. तिथे पोहोचल्यावर आरोपीने तिच्यावर दारू पिण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर पाशवी अत्याचार केले. एवढेच नाही तर, या भयानक घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास किंवा वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने तरुणीला दिली आणि तिला मारहाण केली.

अखेर या भयानक प्रसंगानंतर धाडस एकवटून तरुणीने चंदीगडच्या सेक्टर १७ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित कलमांखाली (कलम ७४, ७९, १२३, १२६ (२) आणि अन्य) जॉन जोसेफवर बलात्काराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, पुराव्यांच्या आधारे आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here