नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने (Padma Vibhushan) सन्मानित करण्यात आले. राजधानी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष नागरी सन्मान समारंभात धर्मेंद्र यांच्या वतीने त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी त्यांची कन्या अहाना देओल देखील उपस्थित होती. धर्मेंद्र यांच्या मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा होताच सभागृहातील वातावरण भावनिक झाले आणि हेमा मालिनी तसेच अहाना देओल यांना अश्रू अनावर झाले. (Hema Malini gets Emotional)
https://prahaar.in/2026/05/26/ipl-2026-playoffs-ipl-playoffs-start-today-know-which-team-will-prevail-over-whom/
सोमवारी झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात हेमा मालिनी जेव्हा मंचावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानासोबतच पतीच्या आठवणींची भावनिक छटा स्पष्ट दिसून आली. सभागृहात बसलेल्या अहाना देओल यांनाही अश्रू आवरता आले नाहीत. या क्षणाचे छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून चाहत्यांकडून त्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केंद्रीय प्रसार माध्यम विभागानेही या सोहळ्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. (Hema Malini gets Emotional)
https://prahaar.in/2026/05/26/bakri-eid-2026-tension-in-mira-road-before-bakri-eid-dispute-over-keeping-goats-in-society-direct-blade-attack-on-youth/
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. (Hema Malini gets Emotional)