विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम; हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमधील बहुजन विकास आघाडीचे (बविआ) शिवसेनेत विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ‘प्रहार’चे बच्चू कडू यांच्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षालाही शिवसेनेत सामावून घेण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रणनीती यशस्वी होऊ शकलेली नाही. विलीनीकरणाबाबतची ही बोलणी प्राथमिक स्तरावरच फिस्कली असून, बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले.
https://prahaar.in/2026/05/26/centre-and-state-governments-to-meet-on-onion-issue-on-wednesday/
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी रवींद्र फाटक यांनी त्यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर फाटक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेऊन ठाणे-पालघर निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन विकास आघाडीच्या विलीनीकरणाचा किंवा पक्षांतराचा कोणताही प्रस्ताव आता शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, शिवसेनेकडून रवींद्र फाटक हेच या निवडणुकीचे अधिकृत उमेदवार असतील हे आता निश्चित मानले जात आहे.
https://prahaar.in/2026/05/26/mlc-election-bjp-wins-15-seats-in-legislative-council/
विलीनीकरणाची चर्चा थांबली असली, तरी स्थानिक पातळीवर राजकीय गणिते जुळवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या रवींद्र फाटक यांनी वसईत जाऊन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
https://prahaar.in/2026/05/26/heated-exchange-between-bhujbal-and-tatkare-at-ncp-meeting/
हितेंद्र ठाकूर यांच्या ठाणे दौऱ्याने वाढवले होते सस्पेन्स
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे अचानक आपल्या खासगी गाडीने ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. ते वैयक्तिक भेटीसाठी ठाण्यात येत असल्याची अधिकृत माहिती समोर आली असली, तरी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेसच ठाकूर ठाण्यात दाखल झाल्याने या भेटीकडे सर्वांचे डोळे लागले होते.