Home ब्रेकिंग न्यूज IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी

IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी

0
IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी

मुंबई : चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सिरीज तसेच डिजिटल माध्यमांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” देण्यात यावा तसेच या क्षेत्राला शासन स्तरावर अधिकृत मान्यता मिळावी, या मागणीसाठी Indian Post Production Association (IPPA) च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. आशिष शेलार यांची भेट घेऊन निवेदनपत्र सादर केले. यावेळी IPPA चे पदाधिकारी महेश चौगुले, भूषण म्हात्रे, प्रवीण हंकारे व अजय मोर्या उपस्थित होते.

पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रात कार्यरत Film Editor, VFX Artist, DI Artist, Sound Designer, Motion Graphics Designer तसेच इतर तंत्रज्ञ व कलाकार चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देत असतात. मात्र त्यांच्या कामाला अद्याप अधिकृत “कलाकार” म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या कलाकारांना योग्य सन्मान, ओळख, संरक्षण व शासन स्तरावरील सुविधा मिळण्यासाठी “कलाकाराचा दर्जा” देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

https://prahaar.in/2026/05/25/five-killed-in-horrific-accident-on-mumbai-agra-highway/

महाराष्ट्रात पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रात कार्यरत सुमारे १ लाख ते १ लाख २० हजार कलाकार व तंत्रज्ञ कार्यरत असून, या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात त्यांना लाभ होऊ शकतो, असे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी मा. आशिष शेलार यांनी या विषयाची तत्परतेने दखल घेत पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांच्या योगदानाची नोंद केली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल व विषय गांभीर्याने ऐकून घेतल्याबद्दल IPPA च्या वतीने मा. आशिष शेलार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होऊन त्यांना योग्य सन्मान व अधिकृत ओळख मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” देण्याच्या मागणीसाठी Indian Post Production Association (IPPA) चे पदाधिकारी महेश चौगुले, भूषण म्हात्रे, प्रवीण हंकारे व अजय मोर्या यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. आशिष शेलार यांना निवेदनपत्र सादर केले.